‘कोरोना’विरूद्धची सगळ्यात मोठी बातमी, ‘लस’शोधल्याचा इटलीचा दावा

‘कोरोना’विरूद्धची सगळ्यात मोठी बातमी, ‘लस’शोधल्याचा इटलीचा दावा

इटलीच्या संशोधकांनी त्याचा माणसांवर प्रयोग केल्यानंतर यश मिळाल्याचा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

  • Share this:

रोम 06 मे: कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या जगाला सध्या फक्त एकाच ध्यासाने पछाडलेलं आहे. तो म्हणजे कोरोनावर औषध शोधण्याचा ध्यास. जगातले सगळे प्रगत देश त्यावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भातले अनेक दावे हे संशोधनाच्या पातळीवरचे आहेत. मात्र इटलीच्या संशोधकांनी कोरोनावर ‘लस’शोधल्याचा दावा केलाय. माणसांवर याचे प्रयोग झाले असून त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याबाबतचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

रोमच्या Spallanzani Hospital मधल्या संशोधकांनी हा दावा केलाय. या लसीचा प्रयोग माणसांवर करण्यात आला आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्या अँटीबॉडीज या व्हायरसचा नाश करतात असा दावाही या संशोधकांनी केलाय.

या अँटीबॉडीजमुळे व्हायरसला शरीरातल्या पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं जातं. त्यामुळे त्या माणसाच्या प्रतिकार शक्तीवर हल्ला करू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

इस्त्रायल आणि अमेरिकेतल्या संशोधकांनीही कोरोनावर लस शोधण्याच्या कामात प्रगती केल्याचा दावा केला आहे. मात्र हे संशोधन असून सुरवातीच्या टप्प्यांमध्येच असून इटलीच्या संशोधकांनी त्याचा माणसांवर प्रयोग केल्यानंतर यश मिळाल्याचा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

173 वर्षांपूर्वी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवत कोरोनाच्या संकटात दिला हात!

अमेरिकेतील फाइजर (Pfizer) आणि जर्मनीतील बायोएनटेक (BioNtech) या कंपन्यांनीही एकत्रितरित्या लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ज्याचं सोमवारपासून ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. जर हे ट्रायल यशस्वी झालं तर ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मेसेंजर RNA या जेनेटिक मटेरियलच्या आधारावर ही लस विकसित करण्यात आली आहे. लस विकसित करण्याचं ही प्रक्रिया पारंपारिक प्रक्रियेपेक्षा वेगळी आणि जलद आहे. पारंपारिक लस बनवण्याच्या प्रक्रियेत कमजोर व्हायरसच्या मदतीनं मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार केल्या जातात, ज्यामुळे ती शरीरात काम करायला खूप कालावधी जातो.

कोरोनाव्हायरसविरोधातील लसीचं ह्युमन ट्रायल सुरू, आता परिणामांची प्रतीक्षा

मानवी शरीरातील पेशींना प्रोटिन बनवण्याच्या सूचना देण्याचं काम मेसेंजर RNA चं असतं. विशेष पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या या मेसेंजर RNA ला मानवी शरीरात टाकलं जाईल जेणेकरून ते पेशींना कोरोनाव्हायरससाठी स्पाइक प्रोटिन तयार करण्याच्या सूचना देतील.

First published: May 6, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या