Home /News /videsh /

हद्दच झाली राव! जनतेचे प्रश्न राहिले बाजूला, संसदेत मोबाइलवर NUDE PHOTO पाहण्यातच दंग झाला खासदार

हद्दच झाली राव! जनतेचे प्रश्न राहिले बाजूला, संसदेत मोबाइलवर NUDE PHOTO पाहण्यातच दंग झाला खासदार

संसदेत (parliment) खासदाराने (mp) हा जो पराक्रम केला तो चव्हाट्यावर आल्यानंतर त्याने काय प्रतिक्रिया दिली ते पाहा.

    बँकॉक, 18 सप्टेंबर : लोक आपला प्रतिनिधी म्हणून खासदार (member of parliment) रूपात एका व्यक्तीला निवडतात. त्यांनी आपले प्रश्न सरकार दरबारी मांडावेत आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा हेतू त्यामागे असतो. मात्र काही खासदार जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करणं तर दूर आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी संसदेत बसून करतात. नुकतीच अशी एक घटना घटली ती थायलँडमध्ये (Thailand). जिथं एक खासदार संसदेतच (Parliament) आपल्या मोबाइलवर न्यूड फोटो पाहत होता. गुरुवारी थायलँडच्या संसदेत बजेटवर चर्चा सुरू होती. त्यावेळी खासदार रोन्नाथेप अनुवत आपल्या मोबाइलवर व्यस्त होते. प्रेस गॅलरीत बसलेल्या पत्रकारांनी त्यांचा फोटो काढला आणि झूम करून पाहिलं. तर रोन्नाथेप मोबाइलवर चक्क न्यूड फोटो पाहत होते. हे फोटो पाहतात पाहता त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्कही हटवला होता आणि किती तरी वेळ मोबाइलमधील तीन न्यूड फोटो टक लावून पाहत होते.रोन्नाथेप हे चोनबुरी प्रांतातील प्रछाराथ पार्टीचे खासदार आहेत. हे वाचा - भारताच्या सायबर आर्मीबद्दल माहीत आहे का? चीनच्या हल्ल्याला उत्तर द्यायला सज्ज संसदेचं कामकाज संपल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आधी शरमेनं आपली मान खाली घातली. त्यानंतर त्यांनी आपण न्यूड फोटो पाहत असल्याचं स्वीकारल केलं. त्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, कुणी एका व्यक्तीने त्यांना फोटो पाठवले होते आणि पैसे, मदत मागत होती. हा फोटो इतकं टक लावून पाहण्याची गरज काय होती, असं विचारल्यावर त्यांनी फोटो झूम करून आपण आजूबाजूच्या गोष्टी पाहत होतो, फोटोतील तरुणीला कोणता धोका तर नाही ना हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. ती तरुणी गँगस्टर्सच्या ताब्यात तर नाही ना, अशी भीती आपल्याला वाटत होती. असं विचित्र स्पष्टीकरण त्यांनी दिलं. हे वाचा - मोठा घातपात करण्याच्या तयारीत किम जोंग? सॅटेलाइट PHOTOने जगभरात खळबळ त्यानंतर तरुणी पैसे मागत असल्याचं समजलं आणि मग आपण  ते फोटो आपल्या मोबाइलमधून डिलीट केल्याचं सांगत त्यांनी सारवासारव केली. प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवताच सरकारने याबाबत खासदाराकडून उत्तर मागितलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Parliment, Porn, Thailand

    पुढील बातम्या