Home /News /videsh /

थायलंडमध्ये आढळला African Swine Fever, लाखो डुकरांची होणार कत्तल; नव्या संकटाची चाहूल

थायलंडमध्ये आढळला African Swine Fever, लाखो डुकरांची होणार कत्तल; नव्या संकटाची चाहूल

कोरोनाच्या उद्रेकापाठोपाठ आता अफ्रिकन स्वाईन फ्लूच्या रुपात आणखी एक गंभीर संकट समोर उभं ठाकलं आहे. थायलंडमध्ये हा विषाणू आढळल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

    बँकॉक, 11 जानेवारी: थायलंडमध्ये (Thailand) नव्या संकटाची (New trouble) चाहूल लागत असून अफ्रिकन स्वाईन फिव्हर (African Swine Fever) दाखल झाल्याची खातरजमा करण्यात आली आहे. कत्तलखान्यातील (Slaughter house) मांसाच्या नमुन्यांची (Sample) तपासणी केल्यानंतर समोर आलेल्या निष्कर्षातून ही बाब स्पष्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वी या आजाराबाबत भलताच गैरसमज थायलंडमध्ये निर्माण झाला होता. हा थायलंडमधील डुकरांच्या जिवाला धोका निर्माण करण्यासाठीचा एखादा व्हायरस असावा, असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र आता संशोधनाअंती तो अफ्रिकन स्वाईन फिव्हर असल्याचं दिसून आलं आहे. स्वाईन फिव्हरचं संकट थायलंडमध्ये घेण्यात आलेल्या 309 नमुन्यांपैकी एका नमुन्यात अफ्रिकन स्वाईन फिव्हरची पुष्टी करण्यात आली आहे. यात विविध 10 फार्म हाऊसमधील डुकरांचे सँपल्स आणि कत्तलखान्यातील मांसाचे दोन सँपल्स यांचा समावेश आहे. या व्हायरसच्या जन्म कुठून झाला, त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.  अगोदर दिला होता नकार युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये या आजारानं शिरकाव केल्याची बाब याअगोदरच उघड झाली होती. मात्र आपल्या देशात आलेला विषाणू हा अफ्रिकन स्वाईन फिव्हरचा असूच शकत नाही, अशी भूमिका थायलंडनं घेतली होती. आपल्या देशातील डुकरांची कत्तल व्हावी, यासाठी आखलेला हा डाव असल्याचा दावाही थायलंडनं केला होता. मात्र संशोधन केल्यावर देशातील डुकरांच्या मार्फत फैलावणारा हा विषाणू स्वाईन फिव्हरचा असल्याचं समोर आलं आहे.  हे वाचा - पाच किलोमीटर क्षेत्रात अलर्ट ज्या परिसरातील डुकराच्या सँपलमधून अफ्रिकन स्वाईन फिव्हरचा विषाणू आढळून आला होता, त्या परिसराच्या 5 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं असून परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील डुकरांच्या खरेदी, विक्री आणि कत्तल करण्यावर सध्या स्थगिती देण्यात आली आहे. ज्या डुकरांना या व्हायरसची लागण झाल्याचा संशय येईल, त्या डुकरांना मारून त्याच्या मालकांना नुकसान भरपाई देण्याची तयारी थायलंडच्या प्रशासनानं केली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Thailand, Virus

    पुढील बातम्या