मराठी बातम्या /बातम्या /विदेश /PUBG खेळात हरल्याच्या राग, आईसह भावंडांचा खून; पाकिस्तानातही गेमवर बंदीची शक्यता

PUBG खेळात हरल्याच्या राग, आईसह भावंडांचा खून; पाकिस्तानातही गेमवर बंदीची शक्यता

PUBG गेममध्ये ज्याप्रमाणे एकदा मेलेली माणसं पुन्हा जिवंत होतात, तशीच खरी माणसंही जिवंत होतील, असं त्याला वाटत होतं. त्याने आपली आई, बहिणी आणि भावाची गोळ्या घालून हत्या केली.

PUBG गेममध्ये ज्याप्रमाणे एकदा मेलेली माणसं पुन्हा जिवंत होतात, तशीच खरी माणसंही जिवंत होतील, असं त्याला वाटत होतं. त्याने आपली आई, बहिणी आणि भावाची गोळ्या घालून हत्या केली.

PUBG गेममध्ये ज्याप्रमाणे एकदा मेलेली माणसं पुन्हा जिवंत होतात, तशीच खरी माणसंही जिवंत होतील, असं त्याला वाटत होतं. त्याने आपली आई, बहिणी आणि भावाची गोळ्या घालून हत्या केली.

लाहौर, 31 जानेवारी: पब्जी गेम (PUBG Game) खेळताना झालेल्या पराभवाचा (Defeat) ताण (Pressure) असह्य होऊन एका अल्पवयीन मुलाने (Minor boy) आपल्याच कुटुंबातील (Murder of family members) चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) लाहौर परिसरात राहणाऱ्या अली झैनने आपली आई, दोन बहिणी आणि एका भावाची गोळ्या झाडून हत्या केली. सतत पब्जी गेम खेळत हा अली त्याच्या खोलीत बसून असायचा. गेममध्ये झालेला पराभव सहन न झाल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. 

गेमसारखंच वाटलं आयुष्य

पब्जी गेममध्ये ज्याप्रमाणे एकदा मारलेली माणसं काही काळाने पुन्हा जिवंत होतात, त्याचप्रमाणे आपली आई, बहिणी आणि भाऊदेखील जिवंत होतील, असं आपल्याला वाटत होतं, असं अलीनं पोलिसांना सांगितलं. तात्कालिक रागातून आपण गोळ्या घालत असताना त्या सर्वांना काही काळासाठी मारत असल्याचं आपल्याला वाटलं. मात्र आई आणि भावंडं परत न आल्यामुळे त्याने हताश होत पोलिसांना या हत्येची कबुली दिली. या गेममध्ये पराभूत होत असल्यामुळे गेमप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही कुणाला तरी गोळ्या घालाव्यात आणि आपण एकटंच शिल्लक राहावं आणि विजयी व्हावं, असे विचार आपल्या मनात आल्याचं अलीनं पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं आहे. 

पब्जीमुळे आलं डिप्रेशन

पब्जी हा गेम जगभरातील अनेक देशांत प्रसिद्ध असून कोट्यवधी मुलं हा गेम खेळत असतात. या गेममध्ये शेवटी जो जिवंत राहतो, तोच विजेता ठरतो. त्यामुळे प्रत्येकाला मारत जाण्याची ही गेम तरुणांना हिंसेला प्रवृत्त करत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. 

हे वाचा -

गेमवर येणार बंदी

पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे पब्जी गेम खेळणाऱ्यांकडून हिंसक कृत्ये घडली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या पोलिसांनी गृहखात्याकडे या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. भारत, चीन आणि इतर काही देशांनी यापूर्वीच पब्जी गेमवर बंदी आणली आहे. 

First published:

Tags: Crime, FAMILY, Murder, Pakisatan, PUBG