जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / युक्रेनकडून रशियाविरुद्ध रणांगणात उतरलेल्या भारतीय तरुणाने व्यक्त केली 'ही' इच्छा

युक्रेनकडून रशियाविरुद्ध रणांगणात उतरलेल्या भारतीय तरुणाने व्यक्त केली 'ही' इच्छा

russia-ukraine-war

russia-ukraine-war

रशिया युक्रेन युद्धादरम्यान,(russia ukraine war ) एक भारतीय तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी, तामिळनाडूचा (Tamilnadu) एक तरूण रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. हा तरुण युक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे. मात्र, त्याला आता मायदेशी परतायचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मार्च: रशिया युक्रेन युद्धादरम्यान,(russia ukraine war ) एक भारतीय तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी, तामिळनाडूचा (Tamilnadu) एक तरूण रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. हा तरुण युक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे. मात्र, त्याला आता मायदेशी परतायचे आहे. अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. 21 वर्षीय या तरुणाचे नाव सैनिकेश रविचंद्रन (Sainikesh Ravichandran) आहे. सैनिकेश मूळचा तामिळनाडूतील कोईम्बतूरचा (Coimbatore) आहे. सनीकेश रविचंद्रनने 2018मध्ये युक्रेनमधील खार्किव येथील नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, रविचंद्रनचा कोर्स जुलै 2022मध्ये पूर्ण होणार होता. काही दिसांपूर्वी तो युक्रेनच्या सैन्यात भरती होत रशियाविरुद्धच्या रणांगणात उतरला आहे. मात्र, आता त्याला मायदेशी परतायचे असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि सैन्याच्या अनेक प्रवेश परीक्षाही दिल्या, मात्र त्याची निवड होऊ शकली नाही. जेव्हा भारतीय अधिकार्‍यांना समजले, की सैनिकेश रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील झाला आहे, तेव्हा त्यांनी सैनिकेशच्या पालकांची चौकशी केली. या चौकशीत असे उघड झाले, की सैनिकेश रविचंद्रन याने यापूर्वी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा दिली होती, मात्र तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, रविचंद्रनचा कोर्स जुलै 2022मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे रविचंद्रन यांच्याशी संपर्क तुटल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले, त्यानंतर त्यांनी भारतीय दूतावासाकडे मदत मागितली, त्यानंतर त्यांनी रविचंद्रन यांच्याशी बोलणे केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या संवादादरम्यानच सैनिकेश रविचंद्रनने त्यांना युक्रेनच्या लष्करात सामील होण्याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. 52 वर्षीय वडील रविचंद्रन यांनी सांगितले की, भारतीय सरकारी अधिकारी त्याच्या संपर्कात होते आणि त्यांनी सैनिकेशला शोधण्याचे आश्वासन दिले आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी मला वचन दिले आहे की ते सैनिकेशला शोधून तेथून आणतील. तसेच ते पुढे म्हणाले, तीन दिवसांपूर्वी मुलगा सैनिकेशशी फोनवर बोलणे झाले होते आणि आता तो भारतात परत येण्यास तयार आहे. असे सांगत माझ्या मुलाला खार्किवमधून बाहेर काढले जाईल, अशी आम्हाला आशा असल्याचे रविचंद्रन यांनी म्हटले आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीसनुसार, जेव्हा रविचंद्रन आपल्या मुलाशी बोलत होते, तेव्हा लष्कराने त्याच्या भारतात परतण्याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे त्याला रणांगणात शोधणे सोपे नाही. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील राहणारा हा विद्यार्थी 2018 मध्ये युक्रेनला गेला होता. २१ वर्षीय सैनिकेश खार्किवमधील नॅशनल एरोस्पेस इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. या वर्षी जुलैमध्ये तो आपले शिक्षण पूर्ण करणार होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात