मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबानचा अजब कारभार! विद्यापीठातून पीएचडी धारकांची हकालपट्टी, नेमला BA पास कुलगुरू

तालिबानचा अजब कारभार! विद्यापीठातून पीएचडी धारकांची हकालपट्टी, नेमला BA पास कुलगुरू

अफगाणिस्तानमधील सर्वात मोठ्या काबुल विद्यापीठाच्या कुलगुरुपदी असणाऱ्या (Taliban removes PhD holder and appoints BA holder as VC of Kabul university) पीएचडी धारक व्यक्तीला हटवून आता बीए पास व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

काबुल, 23 सप्टेंबर : अफगाणिस्तानमधील सर्वात मोठ्या काबुल विद्यापीठाच्या कुलगुरुपदी असणाऱ्या (Taliban removes PhD holder and appoints BA holder as VC of Kabul university) पीएचडी धारक व्यक्तीला हटवून आता बीए पास व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू आपल्या विचारांशी मिळताजुळता असावा, या उद्देशानं तालिबाननं हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Students and teachers protesting against appointment) आक्षेप घेतला असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

कुलगुरू बदलले

काबुल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या पीएचडी धारक मुहम्मद उस्मान बाबरी यांना पदावरून हटवून तालिबानने त्यांच्या जागी केवळ बीए पास असणाऱ्या मुहम्मद अश्रम घैरट यांना कुलगुरू पदावर बसवलं आहे. तालिबानच्या या निर्णयाचा निषेध करत काबुल विद्यापीठातील जवळपास 70 टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

विद्यार्थी आक्रमक

घैरट यांची कुलगुरुपदी निवड झाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही विद्यार्थ्यांनी घैरट यांचे जुने ट्विट शोधून ते व्हायरल करायला सुरुवात केली आहे. घैरट यांनी पत्रकारांच्या हत्येचं समर्थन केलं होतं. अशा प्रकारचे प्रतिगामी आणि मध्ययुगीन विचार असणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठित विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बसवणं हा विद्यापीठाचा आणि विद्यार्थ्यांचाही अपमान असल्याचं शिक्षक आणि पालकांचं म्हणणं आहे.

हे वाचा -Pune Metro Recruitment: पुणे मेट्रो रेल्वेमध्ये तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती

घैरट यांची कारकीर्द

कट्टर परंपरावादी विचाराची व्यक्ती अशी घैरट यांची ओळख आहे. घैरट हे गेल्या सरकारच्या काळात शिक्षण विभागात नोकरी करत होते. त्याचप्रमाणे विद्यापीठांचं मूल्यांकन करण्याच्या समितीवरही त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांचे प्रतिगामी विचार आणि अपुरं शिक्षण यामुळे त्यांच्या नियुक्तीला अफगाणिस्तानमधून जोरदार विरोध होत आहे. तालिबाननं यावर काहीही प्रतिक्रिया दिली असून आपला निर्णय बदलणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Kabul, Taliban