मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकीनं सैन्य मागे घेताच अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचं वर्चस्व सुरु, नवीन नियम लागू

अमेरिकीनं सैन्य मागे घेताच अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचं वर्चस्व सुरु, नवीन नियम लागू

Taliban in Afghanistan: अमेरिकेनं (USA) अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबान (Taliban) या कट्टरतावादी संघटनेनं पुन्हा तिथं आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

अफगानणिस्तान, 15 जुलै:  अमेरिकेनं (USA) अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबान (Taliban) या कट्टरतावादी संघटनेनं पुन्हा तिथं आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील 85 टक्के भागावर तालिबाननं कब्जा केल्याचा दावा अफगाण सरकारनं केला आहे. तालिबाननं आपल्या ताब्यातील भागात कडक इस्लामिक नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. टीव्ही 9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तालिबानचे नियम अतिशय कठोर आणि व्यक्तीस्वातंत्र्याला मारक असतात. महिलांसाठी तर त्यांचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यांच्या नियमांनुसार महिला (Woman) एकट्या घराबाहेर देखील जाऊ शकत नाहीत. पुरुष जोडीदाराशिवाय बाजारात जाण्याची देखील त्यांना मनाई आहे. पुरुषांसाठीही (Man) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुरुषांना दाढी कापण्यास तसंच धूम्रपान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा दिली जाते. त्यामुळं तालिबानचं शासन लागू झालेल्या भागांमधील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा-  भारताने LAC बाबत दिलेल्या 'या' कडक इशाऱ्यानंतर चीनची सबुरीची भूमिका

तालिबान्यांनी गेल्या महिन्यात ताजिकिस्तानच्या सीमेजवळील शिर खान बंदर परिसर ताब्यात घेतला आणि स्थानिक इमामाला पत्र लिहून त्यांच्या आदेशांची माहिती देत अंमलबजावणी करण्याचा हुकुम दिला आहे. यात महिलांना घर सोडता येणार नाही असाही आदेश दिला आहे.

काय आहेत तालिबानचे नवीन कायदे

महिलांना घरात राहण्यास सांगितले असून, त्यांना केवळ पुरुषांसह बाहेर जाण्याची परवानगी आहे.

महिला आणि मुलींनी बुरखा घालणं, पडदा पद्धत वापरणं अनिवार्य आहे.

मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोणीही कोणताही नियम मोडल्यास किंवा लैंगिक गुन्ह्यात अडकलेले आढळल्यास दगड मारून त्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देण्याचा नियम आहे.

पुरुषांना दाढी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नमाज अदा न केल्यास फटके देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुरुषांना पारंपरिक पद्धतीचा कुर्ता-पायजामा घालण्याची परवानगी आहे.

बर्‍याच खेड्यांमध्ये, 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला, मुली आणि विधवांचा विवाह तालिबानमधील मुलांशी लावून देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागातील इमामांना 15 वर्षाखालील मुलींविषयी माहिती तालिबान्यांना द्यावी लागते.

लोकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकांना लाल आणि हिरवे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण हे अफगाणिस्तानच्या ध्वजाचे रंग आहेत.

सर्व पुरुषांना डोक्यावर पगडी घालणं बंधनकारक आहे.

First published:

Tags: USA