Home /News /videsh /

तब्बल 25000 लोकांचा गूढ मृत्यू; जग सांगतंय त्यापेक्षा कोरोना बळींची संख्या अधिक असण्याची शक्यता

तब्बल 25000 लोकांचा गूढ मृत्यू; जग सांगतंय त्यापेक्षा कोरोना बळींची संख्या अधिक असण्याची शक्यता

11 देशांमध्ये 25000 जास्त लोकांचा मृत्यू (death) झाला आहे, ज्याचं कारण समजलेलं नाही. हे मृत्यू कोरोनाव्हायरस (coronavirus) किंवा इतर कारणांमुळे असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

    न्यूयॉर्क, 22 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 178,658 लोकांचा मृत्यू (coronavirus death) झाल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. कारण 11 देशांमध्ये 25,000 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही. न्यूयॉर्क टाइम्सने ही आकडेवारी जारी केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार 11 देशांमध्ये गेल्या महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूव्यतिरिक्त इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूचाही समावेश आहे. स्पनेमध्ये 9 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान 7,300 पेक्षा अधिक मृत्यू झालेत. तर न्यूयॉर्क शहरात याच कालावधीतील मृत्यूची संख्या पाहता मृत्यूदर जवळपास चौपट झाल्याचं दिसून येतं आहे. पॅरिसमध्ये इतर दिवशी होणाऱ्या सामान्य मृत्यूपेक्षा दुपटीने मृत्यू होतो आहे. हे मृत्यू फ्लूच्या महासाथीवेळी होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहेत. मार्चमध्ये इंडोनेशिया सरकारने जकार्तामध्ये 84 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याच महिन्यात जकार्ता स्मशानभूमीत 1000 पेक्षा जास्त लोकांना दफन करण्यात आलं. हे वाचा - जगाला हादरविणाऱ्या व्हायरसचे आहेत 30 प्रकार, असा आहे भारतातला कोरोना मृतांच्या आकड्यांमध्ये गडबड अशा देशांमध्ये दिसून येते आहे, ज्यांनी कोरोनाव्हायरसबाबत उशिरानं प्रतिक्रिया दिली. जसं की इस्तनाबुलमध्ये 9 मार्च ते 12 एप्रिलदरम्यान जितके मृत्यू सांगण्यात आलेत त्यापेक्षा अधिक 2,100 मृत्यूची नोंद झाली. ही आकडेवारी तुर्की सरकारने त्याच काळात जारी केलेल्या कोरोनाव्हायरस मृतांच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. मार्चच्या मध्यात दिसणाऱ्या या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, तुर्की सरकारने कोरोनाव्हायरसच्या पहिल्या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती दिल्याच्या आठवडाभरापूर्वीच म्हणजे फेब्रुवारीत या लोकांना व्हायरसची लागण झाली होती. कोरोनाव्हायरसच्या मृतांची ही आकडेवारी मुद्दाम कमी दाखवली जाते आहे, असं नाही. हेदेखील या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. हे मृत्यू कोरोनाव्हायरस, इतर आजार किंवा इतर कारणांमुळे झालेले असू शकतात. कदाचित या सर्वांवर रुग्णांना उपचार मिळाले नसावेत. कमी टेस्ट झाल्याने काही मृतांना कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत धरण्यात आलं नाही. बहुतेक देशांनी ज्या रुग्णालयात कोरोनाचा मृत्यू झाला आहे, त्यांचीच नोंद केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं नाही आणि त्यामुळेदेखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - दिलासा देणारी बातमी, 15 तासांत 610 रुणांनी दिला कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या