Home /News /videsh /

ब्रिटिशांसमोर अजब पेच! 78 लाख रुपये पगार देऊनही मिळत नाहीत ट्रक ड्रायव्हर, किराणा आणि पेट्रोलचा ठणठणाट

ब्रिटिशांसमोर अजब पेच! 78 लाख रुपये पगार देऊनही मिळत नाहीत ट्रक ड्रायव्हर, किराणा आणि पेट्रोलचा ठणठणाट

ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे बाजारात (Super markets in Britain getting empty due to lack of truck drivers) जीवनावश्यक वस्तूच उपलब्ध होणं बंद झालं आहे.

    लंडन, 25 सप्टेंबर : ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे बाजारात (Super markets in Britain getting empty due to lack of truck drivers) जीवनावश्यक वस्तूच उपलब्ध होणं बंद झालं आहे. जागोजागची सुपरमार्केट, पेट्रोल पंप आणि इतर दुकानं (Business of super markets, Petrol Pump is stopped) ओस पडली आहेत. परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती पसरल्यामुळे लोक साठेबाजी करत आहेत. त्यामुळे आता ब्रिटन सरकारनं आपल्या सैन्यातील 1 लाख जणांना (1 lack soldiers to drive truck) ट्रक ड्रायव्हिंगच्या कामाची जबाबदारी सोपवणार आहे. ही आहे समस्या अगोदर झालेलं ब्रेक्झिट आणि त्यानंतर कोरोनाचं संकट अशा दुहेरी कारणांमुळे ब्रिटनमधील ट्रक ड्रायव्हर कमी झाले आहेत. ब्रिटनमध्ये ट्रक चालवणारे बहुतांश ड्रायव्हर हे इतर युरोपीय देशातील होते. मात्र ब्रेक्झिटनंतर त्यांना ब्रिटन सोडून आपापल्या देशात परत जावं लागलं. ब्रिटनमधील अनेक ड्रायव्हर हे कोरोना काळात आजारी पडले आणि त्यांनी नोकऱ्या सोडल्या. त्यामुळे आता ट्रक चालवणार कोण, असा प्रश्न सरकारसमोर पडला आहे. साठेबाजीला सुरुवात जीवनावश्यक वस्तूच बाजारात येत नसल्याचं दिसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अधिकचे सामान घरात भरून ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्रिटनच्या अनेक भागातील सुपर मार्केटस् सध्या रिकामी आहेत. पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल घेऊन येणारी ट्रक वाहतूकदेखील कमी झाली आहे. परिणामी इंधनाअभावी अनेक वाहनं जागीच खोळंबली असल्याचं चित्र आहे. पगार देऊनही ड्रायव्हर नाही ब्रिटनमध्ये प्रत्येक ड्रायव्हरला सरकारकडून वर्षाकाठी सरासरी 63 हजार पाऊंड (63 लाख रुपये) ते 78 हजार पाऊंड (78 लाख रुपये) एवढा पगार दिला जातो. मात्र तरीही ड्रायव्हरचा दुष्काळ आहे. भाजीचा व्यवसाय करणाऱ्या एका चेनने तर ड्रायव्हरना दर तासाला 30 पाऊंड (3030 रुपये) देण्याची ऑफर दिली होती. मात्र तरीही ड्रायव्हर मिळत नसल्याचं चित्र आहे. हे वाचा - 'हॅलो, मी अनन्या बोलतेय', जाळ्यात अडकवून बेरोजगार तरुणाला लुटलं; 92हजारांना गंडा सैनिक चालवणार ट्रक ब्रिटनच्या सैन्यातील 1 लाख जवानांना आता ट्रक चालवण्यासाठी उतरवण्याची तयारी सरकारनं केली आहे. त्यामुळे देशातील दळवळणाचा प्रश्न सुटेल आणि सामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Petrol and diesel

    पुढील बातम्या