• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भाषण सुरू असतानाच एकाने राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली, कारण वाचून व्हाल थक्क; पाहा VIDEO

भाषण सुरू असतानाच एकाने राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली, कारण वाचून व्हाल थक्क; पाहा VIDEO

राज्यपालांचं व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच एका इसमाने सर्वांसमोर त्यांच्या कानशिलात (Stranger slaps governor on stage video goes viral) लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  तेहरान, 24 ऑक्टोबर : राज्यपालांचं व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच एका इसमाने सर्वांसमोर त्यांच्या कानशिलात (Stranger slaps governor on stage video goes viral) लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इराणमधील विभागीय राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यानच हा प्रकार घडला. राज्यपाल भाषण करण्यासाठी (Slapped while speech on stage) स्टेजवर गेले. त्यांनी भाषण सुरू केलं. तेवढ्यात एक व्यक्ती स्टेजवर आली आणि त्याने थेट राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली. कारण वाचून व्हाल थक्क स्टेजवर जाऊन राज्यपालांना कानशिलात लगावण्यामागचं कारण हे काहीसं विचित्र आहे. या व्यक्तीच्या पत्नीला पुरुष कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लस टोचून घ्यावी लागली. पत्नीला लस टोचण्यासाठी महिला कर्मचारी न मिळाल्याचा राग मनात धरून त्याने थेट राज्यपालांवर हल्लाबोल केला. या घटनेमुळे राज्यपालदेखील क्षणभर हडबडले मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ होतोय व्हायरल अबेदिन खोर्रम यांनी उत्तर-पश्चिम इराणच्या अजरबैजान प्रांताचे गव्हर्नर म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर जनतेला संबोधित कऱण्यासाठी ते स्टेजवरून भाषण करत होते. त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली होती आणि त्यांचा माईकदेखील ऑन होता. त्यामुळे त्यांना थप्पड लगावल्याचा जोरदार आवाज सभागृहात घुमला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होऊ लागला. हे वाचा- लग्नाआधीच प्रेयसीचा अपघात; तरीही तरुणाने बांधली लग्नगाठ, पण वाईट झाला शेवट माथेफिरूवर कारवाई थप्पड मारणारी व्यक्ती ही इराणच्या सैन्यदलात कार्यरत असून एक सैनिक असल्याची माहिती ‘फारस न्यूज एजन्सी’च्या रिपोर्टमधून देण्यात आली आहे. तर खोर्रम हे IRGC चे माजी विभागीय कमांडर आहेत. सीरियाकडून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांनी त्यातून स्वतःची सुटकादेखील करून घेतली होती. आपल्या पत्नीला पुरुष कर्मचाऱ्यानं लस दिली, या कारणावरून सैनिक भडकला आणि त्याने राज्यपालांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना फरफटत सभागृहाबाहेर नेले.
  Published by:desk news
  First published: