ऍस्टोनिया, 12 नोव्हेंबर: जगात असं एक (Story of an island where 90 percent population is female) बेट आहे जिथला कारभार पूर्णतः महिलांच्या हातात असतो. जगातील बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक (Financial power in hands of women) पद्धती असल्याचं आपल्याला दिसतं. अशा व्यवस्थेत महिलांवर असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणारे अधिकार या दोन्हीवर मर्यादा असल्याचं दिसतं. अनेक बाबतीत महिलांना पुरुषांवर अवलंबून राहावं लागतं. मात्र जगात असं एक बेट आहे जिथं पूर्ण कारभार महिलांच्या हातात असतो.
महिलांच्या हाती कारभार
ऍस्टोनियाच्या किहनु बेटावर बहुतांश लोकसंख्या ही महिलांची आहे. एकूण लोकसंख्येच्या तब्बल 90 टक्के जनता ही महिला आहे. या बेटाची पूर्ण व्यवस्था आणि जबाबदारी महिला सांभाळतात. महिलांच्या नावानेच या बेटाची ओळख बनली असून युनेस्कोच्या इंटॅजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटीच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
महिला करतात धार्मिक विधी
या बेटावरचे सर्व धार्मिक विधी महिलाच पार पाडतात. मुलाच्या जन्माच्या विधीपासून ते अंत्यसंस्कारापर्यंतचे अनेक विधी महिलांकरवी करण्यात येतात. याच माध्यमातून महिला पैसे कमावतात आणि चरितार्थ चालवतात. या बेटावर लग्न लावण्याचं कामदेखील महिलांकडेच असतं.
तडीपारांचं बेट
हे बेट तडीपारांचं बेट म्हणून ओळखलं जातं. तडीपारीची शिक्षा झालेले अऩेक गुन्हेगार आणि आरोपी या बेटावर येत असतात. मात्र इथल्या महिला या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे मॅनेज करत असल्याचं दिसून येतं. महिलांच्या हाती बेटाचा आर्थिक गाडा असल्यामुळेच सर्व काही वर्षानुवर्षे सुरळीत असल्याचं सांगितलं जातं.
हे वाचा-ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट; भारतावरही सावट
नवी आव्हानं
गेल्या काही वर्षांत मात्र पारंपरिक व्यवसाय करून चरितार्थ चालवणे आव्हानात्मक बनत चालले आहे. नव्या पिढीला शिक्षण घेऊन शहरी भागात नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे इथली तरूण पिढी बेटावरून बाहेर जात असून केवळ वयोवृद्ध महिला बेटावर मुक्कामी असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलींनी बाहेरच नोकरी न करता पुन्हा बेटावर येऊन नव्या कल्पना राबवाव्यात आणि इथला विकास करावा, अशी इथल्या स्थानिकांची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Culture and tradition, Women