कोलंबो 9, एप्रिल : श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून (Sri Lankan Economic Crisis) जात आहे. देशात इंधन (Fuel) आणि औषधांचा (Medicines) तुटवडा निर्माण झाला आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोकांना एकवेळचं अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकटामुळे देशाच्या राजकारणात बरीच उलथापालथ होत आहे. दरम्यान, देशाच्या नव्या अर्थमंत्र्यांनी देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे हे सांगितले आहे. 3 अब्ज डॉलर मदतीची गरज वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, देशाचे नवे अर्थमंत्री अली साबरी (Ali Sabry) यांनी म्हटले आहे की, इंधन आणि औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि अभूतपूर्व आर्थिक संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी श्रीलंकेला पुढील सहा महिन्यांत सुमारे 3 अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल. हे एक कठीण काम आहे : साबरी साबरी यांनी गेल्या आठवड्यातच श्रीलंकेचे अर्थमंत्रीपद स्वीकारले. अर्थमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या मुलाखतीत, साबरी यांनी 3 अब्ज डॉलर निधी उभारण्याबद्दल सांगितले, “हे एक कठीण काम आहे.” असेही ते म्हणाले. भारतासोबत चांगले संबंध असतानाही श्रीलंकेनं का ताब्यात घेतले 12 भारतीय मच्छिमार? सुटकेसाठी मागितली इतकी रक्कम श्रीलंका या प्रयत्नांमध्ये गुंतले दक्षिण आशियातील हे बेट राष्ट्र आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोख्यांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना पेमेंटवर स्थगिती हवी आहे. जुलैमध्ये एक अब्ज डॉलर्सच्या पेमेंटवर बाँडधारकांशी वाटाघाटी करेल असा या देशाला विश्वास आहे. त्याच वेळी, श्रीलंका या महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत चर्चेसाठी तयार आहे. हे आहे सरकारचे प्राधान्य साबरी म्हणाले की, श्रीलंका सरकारचे प्राधान्य इंधन, गॅस, औषधे आणि नंतर वीजेचा पुरवठा सामान्य करणे सुरू आहे. लोकांचा रोष शमवणे हा त्यांचा उद्देश आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी श्रीलंकेतील 2.2 कोटी लोक दीर्घकाळ वीज कपात, औषधे आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे संतापले आहेत. संतप्त लोक निदर्शने करत आहेत आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. श्रीलंकेत सध्या काय परिस्थिती आहे? श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अन्नासाठी रेशनिंग आहे. खाद्यपदार्थांसाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही गोंधळ आहे. अनेकांचे अन्न पूर्णपणे संपले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकृतपणे ही कपात 10 तासांची असली तरी प्रत्यक्षात विजेची स्थिती बिकट आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या असून लोकांना तिथे गाडी पार्क करून परत जा, तेल आल्यावर सांगितले जाईल, असे सांगण्यात आले आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा रिकामा झाला आहे. महागाई अनेक पटींनी वाढली आहे. त्यांची ही अवस्था कशी झाली, याचा संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. श्रीलंकेतील लोक आता तेथून बोटीतून पळून शेजारच्या देशांकडे धावत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.