जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Sri Lanka : श्रीलंकेचे राष्ट्रपती कुणाच्या मदतीनं मालदीवला पळाले? मध्यरात्रीच्या थराराची Inside Story

Sri Lanka : श्रीलंकेचे राष्ट्रपती कुणाच्या मदतीनं मालदीवला पळाले? मध्यरात्रीच्या थराराची Inside Story

Sri Lanka : श्रीलंकेचे राष्ट्रपती कुणाच्या मदतीनं मालदीवला पळाले? मध्यरात्रीच्या थराराची Inside Story

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) रात्रीतून त्यांच्या कुटुंबासह मालदीवला पळून गेले आहेत. त्यांना मालदिवला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली? हा प्रश्न आता पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka in Crises) सध्या पेटलाय. श्रीलंकेतील आर्थिक संकट चिघळलं असून त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. संतप्त नागरिर रस्त्यावर उतरले असून देशातील नेते एकापाठोपाठ एक देश सोडून पळून जात आहेत. राष्ट्रपती गोटाबया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) देखील रात्रीतून त्यांच्या कुटुंबासह मालदीवला पळून गेले आहेत. त्यांना मालदिवला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली? हा प्रश्न आता पडला आहे. गोटाबाया देशातच असून ते 13 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देतील, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. पण, त्यांच्या रात्रीतून पळून जाण्यानं नवा पेच निर्माण झाला आहे. गोटाबया राजीनामा न देता पळाले आहेत. त्यामुळे नवे राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सध्या स्थगित झाली आहे. का पळाले राजपक्षे? गोटाबया राजपक्षे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे श्रीलंकेतून सुखरूप बाहेर पडण्याची त्यांची इच्छा होती. राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे शक्य झाले नसते. कसे पळाले राजपक्षे? एअरफोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं राष्ट्रपतींना विमान उपलब्ध करून दिले. त्यांनी राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना हे विमान दिले. राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला असता तर त्यांना हे विमान मिळाले नसते. CNN News18 नं दिलेल्या वृत्तानुसार राजपक्षे यांच्या पलायनातील मोठी माहिती समोर आहे. त्यांना श्रीलंकेतून मालदीवमध्ये जाण्यासाठी मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मदत केली होती. नशीद यांनीच श्रीलंकन एअरफोर्सचे विमान एअरक्राफ्ट करण्यासाठी कॉल केला होता. मालदीवच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं राजपक्षेंचे विमान उतरण्यास सुरूवातीला परवानगी दिली नव्हती. पण, नशीद यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांनी स्वत: कंट्रोलरला फोन केला त्यानंतर विमान उतरण्यास परवानगी मिळाली. श्रीलंकेतील पेच चिघळला, राष्ट्रपतींचे देशाबाहेर पलायन कधी देणार राजीनामा? गोटाबया राजपक्षे कधी राजीनामा देणार? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही. ते त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचल्यानंतर राजीनामा देतील अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलीय. राजपक्षे मालदीवहून दुबईला जाऊ शकतात, अशी माहिती देखील काही वृत्तामध्ये देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात