कोलंबो, 9 जुलै : श्रीलंकेतील परिस्थिती (Economic crisis) हाताबाहेर जात चालली आहे. आता आंदोलनकर्त्यांनी श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या खासगी घरात घुसून आग लावली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काही वेळापूर्वीच आपला राजीनामा दिला आहे. मात्र तरीही आंदोलनकर्त्यांचा राग शांत होताना दिसत नाही. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या गाडीचंही नुकसान केलं. याचा काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या खासगी घरात घुसून आग लावली आणि त्यांच्या गाड्यांचंही नुकसान केलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Sri Lanka Prime Minister Ranil Wickremesinghe) यांनी सरकार चालू ठेवण्यासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली. (Ranil Wickremesinghe Resign Tweet)
WATCH: Protesters storm presidential palace in Sri Lanka as economic crisis worsens pic.twitter.com/diIVaXx8Cd
— BNO News (@BNONews) July 9, 2022
ते म्हणाले की, सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची सर्वोत्तम शिफारस स्वीकारतो. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बेटव्यापी इंधन वितरण या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. तसेच जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक (World Food Program Director) या आठवड्यात देशाला भेट देणार आहेत. आणि आयएमएफचा कर्ज स्थिरता अहवाल लवकरच तयार होणार आहे." “नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या या शिफारसीला ते सहमत आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
Sri Lanka protesters are seen swimming in the president’s pool after thousands stormed the presidential palace Saturday demanding his resignation as the country faces a severe economic crisis. pic.twitter.com/NsTnATol4x
— CBS News (@CBSNews) July 9, 2022
श्रीलंकेतील आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव -
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील आंदोलनाची झळ राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनाही बसली आहे. आंदोलकांनी शनिवारी कोलंबोमधील राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर गोटाबाया त्यांचे अधिकृत निवास्थान सोडून पळून गेले (Gotbaya Rajapaksa fleed from his own house) आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्षांवर आंदोलकांचा मुख्य राग आहे. त्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यानंतरही राजपक्षे राजीनामा न देण्यावर ठाम होते. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पद सोडणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. अखेर त्यांना संतप्त आंदोलकांपासून वाचण्यासाठी घर सोडून पळावं लागलं आहे. अनेकांनी तर राष्ट्रपती भवनातील स्वीमिंग पुलमध्ये उडी मारली.