मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारताच्या शेजारी देशात परिस्थिती बिकट, Food Emergency ची घोषणा; दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

भारताच्या शेजारी देशात परिस्थिती बिकट, Food Emergency ची घोषणा; दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

Economic Emergency in Sri Lanka: श्रीलंका (Srilanka) हा देश सध्या आर्थिक संकटाशी लढतो आहे. तिथे अन्नधान्यविषयक आणीबाणीची (Food Emergency) परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

Economic Emergency in Sri Lanka: श्रीलंका (Srilanka) हा देश सध्या आर्थिक संकटाशी लढतो आहे. तिथे अन्नधान्यविषयक आणीबाणीची (Food Emergency) परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

Economic Emergency in Sri Lanka: श्रीलंका (Srilanka) हा देश सध्या आर्थिक संकटाशी लढतो आहे. तिथे अन्नधान्यविषयक आणीबाणीची (Food Emergency) परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

कोलंबो, 03 सप्टेंबर: श्रीलंका (Srilanka) हा देश सध्या आर्थिक संकटाशी लढतो आहे. तिथे अन्नधान्यविषयक आणीबाणीची (Food Emergency) परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. कारण खासगी बँकांकडे आयातीसाठी परकीय चलनाचा अभाव आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी मंगळवारी (31 ऑगस्ट) तांदूळ आणि साखरेसह अन्य जीवनावश्यक अन्नधान्याच्या साठेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा अध्यादेशांतर्गत आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली. मंगळवारी मध्यरात्रीपासून तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

साखर, तांदूळ, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक अन्नधान्याच्या पदार्थांच्या किमतींमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे ही आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. श्रीलंकेत दूध पावडर, रॉकेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासत असून, दुकानांबाहेर मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या आहेत. साठेबाजीसाठी सरकारने व्यापाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) यांनी तांदूळ, साखर आदी जीवनावश्यक अन्नधान्याच्या पुरवठ्याच्या (Essential Food Items) समन्वयासाठी सैन्याच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची आवश्यक सेवा आयुक्ताच्या रूपाने नियुक्ती केली आहे. सरकारने अन्नधान्याच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.

हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कुठला? शास्त्रज्ञांनी शोधलं उत्तर

या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती कोरोनाच्या भयावह संकटाची. ते संकट अद्याप संपलेलं नाही. 21 दशलक्ष लोकसंख्येचा हा देश कोरोना विषाणूच्या संसर्गाशी अद्याप लढतो आहे. कोरोनामुळे तिथे दररोज 200हून अधिक जणांचा मृत्यू होतो आहे. या संकटाशी दोन हात करतानाच श्रीलंका आपलं मोठं कर्ज फेडण्यासाठीही संघर्ष करतो आहे.

यावर्षी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनात 7.5 टक्के घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका'ने अलीकडे अलीकडेच आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा उद्देश आयातदारांद्वारे देशातल्या बँकांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची वसुली करणं हा आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार, श्रीलंकेच्या परकीय गंगाजळीच्या साठ्यात घट होऊन ती जुलैअखेरीस 2.8 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. नवं सरकार सत्तेत आलं तेव्हा, नोव्हेंबर 2019 मध्ये हा साठा 7.5 अब्ज डॉलर्स एवढा होता. त्या तुलनेत आताचा साठा फारच कमी आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम होत असून, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

हे वाचा-'काबुलच्या कसाया'ची भारताला धमकी! 'जुन्या सरकारच्या समर्थकांना शरण देऊ नका'

एकीकडे आरोग्यविषयक खर्चांमध्ये वाढ आणि दुसरीकडे लॉकडाउन किंवा निर्बंधांमुळे नियमित उत्पन्नवाढीला खीळ असा दुहेरी फटका कोरोनामुळे सर्वच देशांना बसतो आहे; मात्र श्रीलंकेसारख्या छोट्या आणि विकसनशील देशांना त्या परिस्थितीला तोंड देणं अत्यंत कठीण जात आहे.

First published:

Tags: Sri lanka