मराठी बातम्या /बातम्या /विदेश /स्पेनमध्ये वेश्याव्यवसायात झाली वाढ; पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय

स्पेनमध्ये वेश्याव्यवसायात झाली वाढ; पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय

स्पेनमध्ये वेश्या व्यवसायासंबंधी कोणताही नियम नाही. पैसे देऊन सेक्स करणाऱ्यांना कोणतीही शिक्षा निश्चित केलेली नाही. से

स्पेनमध्ये वेश्या व्यवसायासंबंधी कोणताही नियम नाही. पैसे देऊन सेक्स करणाऱ्यांना कोणतीही शिक्षा निश्चित केलेली नाही. से

स्पेनमध्ये वेश्या व्यवसायासंबंधी कोणताही नियम नाही. पैसे देऊन सेक्स करणाऱ्यांना कोणतीही शिक्षा निश्चित केलेली नाही. से

     मुंबई,20ऑक्टोबर-  वेश्या व्यवसाय हा जगभरात केला जातो पण काही देशांत तो कायदेशीर आहे तर काही देशांत तो बेकायदेशीर आहे. भारतातही हा व्यवसाय बेकायदेशीर मानला जातो. भारतीय समाजातही या व्यवसायाला विशेष महत्त्वाचं स्थान नाही. त्यामुळे त्याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. स्पेनसारख्या देशात हा व्यवसाय कायदेशीर स्वरूपाचा होता म्हणजे महिला आणि पुरुष हा व्यवसाय करून पैसे कमवत असतील तर ते अधिकृत मानलं जात होतं. पण आता या व्यवसायाला वेगळं रूप यायला लागल्याने त्या मान्यता काढून घेण्यात आली आहे. 1995 पासून स्पेनमध्ये (Spanish) वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आला होता. मात्र, आता स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज (Pedro Sanchez) यांनी वेश्या व्यवसायाची कायदेशीर मान्यता काढून घेत असल्याचं जाहीर केलं आहे. रविवारी (17 ऑक्टोबर) त्यांनी ही घोषणा केली. 'महिलांना गुलाम बनवणारी ही प्रथा' बंद करणार (ban prostitution) असल्याचं त्यांनी सांगितलं. आजतक ने याबाबत वृत्त दिले आहे.

    व्हॅलेन्सिया (Valencia) येथे स्पेनमधील सोशलिस्ट वर्कर्स पक्षाचे (Socialist Workers' Party) तीन दिवसीय संमेलन नुकतेच झाले. या संमेलनात बोलताना स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी वेश्या व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे जाहीर करतानाच ही प्रथा बंद करणार असल्याचे सांगितलं.

    1995 पासून स्पेनमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आला होता. स्पेनमधला वेश्या व्यवसाय 4.2 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज 2016 साली संयुक्त राष्ट्रांनी (United Nations estimates) वर्तवला होता. स्पेनमध्ये प्रत्येक 3 पुरुषांपैकी एक पुरुष पैसे देऊन सेक्स करत असल्याचं 2009 च्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. तर, 2009 मधीलच दुसऱ्या सर्वेक्षणानुसार हा आकडा 39 टक्क्यांपर्यंत वाढला असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसंच थायलंड आणि पोर्टोनंतर वेश्या व्यवसायाचं तिसरं मोठं केंद्र स्पेन असल्याचं 2011 साली संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केलं होतं.

    (हे वाचा:पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात गोंधळ)

    स्पेनमध्ये वेश्या व्यवसायासंबंधी कोणताही नियम नाही. पैसे देऊन सेक्स करणाऱ्यांना कोणतीही शिक्षा निश्चित केलेली नाही. सेक्स वर्कर आणि ग्राहकांमध्ये दलाली करणं मात्र या ठिकाणी बेकायदा आहे. वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आल्यापासून स्पेनमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात सध्या जवळपास 3 लाख महिला वेश्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

    2019 मध्ये स्पॅनिश पोलिसांनी 896 महिलांना वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढलं होतं. यापैकी किमान 80 टक्के महिलांनी सांगितलं की दलालांकडून त्यांचं शोषण होत होतं. लैंगिक शोषण रोखण्यासाठी काम करणाऱ्या APRAMP नावाच्या संस्थेचे म्हणणे आहे की, ‘वेश्या व्यवसाय ही महिलांच्या लैंगिक स्वातंत्र्याची अभिव्यक्ती नाही. ते हिंसा, अधिकारांचे उल्लंघन, आर्थिक आव्हाने आणि पुरुषप्रधान संस्कृती शी जोडलेलं आहे. दरम्यान, सोशलिस्ट पार्टीचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे जेव्हा लैंगिक हिंसा आणि सहमतीने सेक्स करण्याचे मुद्दे सार्वजनिक चर्चेचा भाग होत आहेत.’

    (हे वाचा:हनीमूनसाठी जाणं या कपलला पडलं महागात; 100 वर्षांपूर्वी जमिनीत पुरलेला बाँब फुटला)

    दक्षिण-पूर्व स्पेनमधील सेक्स वर्कर्सना पाठिंबा देणारी संस्था CATS म्हणते की, ‘अशा योजनांद्वारे वेश्या व्यवसायाची समस्या सोडवणं शक्य नाही. या व्यवसायात असलेले लोक जेथे व्यवसाय करतात, त्या ठिकाणांवरून त्यांना बाहेर काढले तर त्यांना रस्त्यावर असा व्यवसाय करण्यास भाग पाडले जाईल. अशा स्थितीत सेक्स वर्कर्स, दलाल यांचा धोका आणखी वाढेल.

    तर, सेक्स इंडस्ट्रीवर संशोधन केलेल्या स्पॅनिश पत्रकार सीझर जारा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘स्पेनमध्ये वेश्या व्यवसायाचा 95 टक्के भाग मुक्त नाही. त्यात नक्कीच एक प्रकारचा दबाव आहे. सामाजिक-आर्थिक मर्यादा, धमक्या किंवा कोणत्याही दबावाखाली येऊन महिला हे काम करतात. जर्मनीनंतर स्पेन ही युरोपमधील वेश्या व्यवसायाची दुसरी मोठी बाजारपेठ आहे.’

    ‘महिलांना गुलाम बनवणारी ही प्रथा' बंद करणार असल्याची घोषणा स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी केली आहे. मात्र, स्पेनमध्ये 1995 पासून वेश्या व्यवसाय हा कायदेशीर आहे. त्यामुळे आता हा व्यवसाय बंद करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान सांचेज यांच्यासमोर असणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Spain