सोमालियामध्ये मोठा आत्मघातकी हल्ला, 7 लोकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

सोमालियामध्ये मोठा आत्मघातकी हल्ला, 7 लोकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये शनिवारी आईस्क्रीमच्या दुकानात झालेल्या आत्मघाती स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मोगादिशू, 28 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाचं संकट असताना आता दहशतवादी आणि आत्मघातकी हल्ल्याचं प्रमाण वाढत आहे. भारतात 26 नोव्हेंबरला सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये शनिवारी आईस्क्रीमच्या दुकानात झालेल्या आत्मघाती स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. अल कायदाशी संबंधित इस्लामिक दहशतवादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अमेरिकेचे कार्यवाह संरक्षण-सचिव क्रिस्तोफर मिलर यांच्या भेटीच्या काही तासानंतर हा हल्ला झाला आहे. ख्रिस्तोफर मिलर अमेरिकेच्या राजदूत आणि सैन्य दलाच्या जवानांना भेटण्यासाठी मोगादिशुला गेले होते. त्यांच्या भेटीनंतर काही तासांतच हा हल्ला झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 जवान शहीद

सोमालियाच्या प्रशासनाकडून हा आत्मघातकी हल्ला आईस्क्रिमच्या दुकानात घडवून आणल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. या क्रूर आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला पहिल्यांदाच झाला असे नाही. या आधीदेखील अल-शबाबने ऑगस्टमध्ये मोगादिशुमध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी एका हॉटेलला टार्गेट करून तिथल्या नागरिकांना बंदी बनवलं होतं. त्यावेळी दहशतवाद्यानं केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 9 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी देखील अल-शबाबने या कुख्यात दहशतवादी संघटनेनं घेतली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 28, 2020, 8:23 AM IST

ताज्या बातम्या