अफगणिस्तान, 13 जून : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात भारत, अमेरिका आणि पाकिस्तान यांसारख्या काही देशांमध्ये परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एक पर्याय आहे. मात्र लॉकडाऊन सरसकट फार काळ लागू करणं अवघड आहे. अशा परिस्थितीत विविध देशांमधून नवनव्या कल्पना समोर आणल्या जात आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देशातील शेकडो भागात स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन लागू केला आहे. याला स्मार्ट लॉकडाऊन म्हटले जात आहे. त्याअंतर्गत ज्या भागात संसर्गाचे प्रमाण वाढत आहेत, तो परिसर बंद केला जात असून लोकांना त्यांच्या घरात राहाण्याचे आवाहन केले जात आहे. मार्चमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला, परंतु नंतर अर्थव्यवस्थेचे कारण देत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. ते शनिवारी म्हणाले, “आमच्यासारख्या देशांमध्ये केवळ स्मार्ट लॉकडाऊनचा पर्याय आहे. तरच याचा परिणाम गरीबांना सोसावा लागणार नाही. " त्याचबरोबर त्यांनी सर्वसामान्यांना इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले, ‘मला वाईट वाटतंय की लोक निर्बंधाकडे गांभीर्याने पाहात नाहीत, असंच सुरू राहिलं तर आपल्याला निर्बंध कडक करावे लागतील.’ बीबीसी हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इम्रान खान म्हणाले की, जर लोकांनी खबरदारी घेतली तरच परिस्थिती नियंत्रणात राहू शकेल. शनिवारी पाकिस्तानमध्ये एका दिवसात सर्वाधिक संक्रमण झालेले आढळले आहे. शनिवारी पाकिस्तानमध्ये कोरोना संसर्गाची 6,472 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यासह, देशात संसर्गाची एकूण संख्या 1,32,405 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2,551कांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा- कोरोनाच्या संकटात अमेरिकेत निवडणुकीचे बिगुल; ट्रम्प यांनी केलं रॅलीचं आयोजन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.