वॉशिंग्टन, 13 जून : सध्या संपूर्ण जग जागतिक महासाथ कोरोनाच्या संकटात आहे. यामध्ये अमेरिकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे जॉर्ज फ्लॉडच्या मृत्यूच्या निषेध. त्यात यावर्षी नोव्हेंबरमध्येच येथे राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही काहीसे चिंतेत आहेत. कोरोनादरम्यान घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकन जनता त्यांच्यावर काहीशी नाराज आहे. फ्लॉइडच्या निधनानंतर ट्रम्प यांच्यावरही सतत टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत निवडणूक रॅलीदेखील या महिन्यापासून सुरू होत आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कंबर कसली आहे
19 जून रोजी आहे फ्रिडम –डे
एबीसी न्यूजनुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार 19 जून रोजी गुलामी निर्मूलनाच्या प्रथेविरोधात स्वातंत्र्य साजरा केला जातो. या सुट्टीला जुनटीथ नाव देण्यात आले आहे. म्हणजेच हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणूनही ओळखला जातो.
आफ्रिकन अमेरिकेन नागरिकांनी केली होती विनंती
या दिवसाच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या रॅलीची तारीख बदलली आहे. ट्रम्प म्हणाले की, बर्याच आफ्रिकन अमेरिकन लोकांना त्यांच्या रॅलीची तारीख बदलण्याचा विचार करण्याची विनंती केली होती. अशा परिस्थितीत या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन ट्रम्प यांनी शनिवारी 20 जून रोजी आपली पहिली निवडणूक रॅली जाहीर केली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 1,16,825 लोकांचा मृत्यू
जगातील कोरोना साथीच्या आजाराने अमेरिका सर्वाधिक प्रभावित झाला आहे. सध्या या देशात कोरोना प्रकरणांचा वेग कमी झाला आहे. मात्र कोरोनाचे अद्याप भीतीदायक रूप आहे. शुक्रवारी देशात 26,971 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 791 लोकांचा मृत्यू झाला. त्यानुसार देशात 21 लाखांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटेपर्यंत अमेरिकेत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 21 लाख 16 हजारांवर पोहोचली आहे.
हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी