केपटाऊन, 27 ऑक्टोबर: सहा वाघांनी हल्ला करूनही (six tigers attacks Giraffe but fails to kill him) एका जिराफानं हार न मानल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वाघ हा जंगलातील (Tiger is powerful animal) एक ताकदवान प्राणी असतो. त्याची ज्या प्राण्यावर शिकारीसाठी नजर पडेल, त्याचा जीव जाणार, हा जणू काही अलिखित नियमच असतो. मात्र एका जिराफानं या (Giraffe reverted tiger attack) नियमाला अपवाद ठरण्याचं काम केलं. सहा वाघांनी हल्ला चढवूनदेखील या जिराफानं आपली मान तुकवली नाही.
वाघांच्या गटाने केला हल्ला
‘द सन’च्या रिपोर्टनुसार दक्षिण अफ्रिकेतील क्लेसरी गेम रिजर्वमधील हा व्हिडिओ आहे. या जंगलात एका जिराफानं सहा वाघांचा हल्ला परतवून लावला. जंगलातून चाललेल्या जिराफावर सहा वाघांनी अचानक हल्ला चढवला. मात्र या हल्ल्याने जिराफ अजिबातच भेदरून गेला नाही. एका वाघानं जिराफाच्या पायाचे लचके तोडायला सुरुवात केली. दुसरा वाघ जिराफाच्या पाठीवर चढला आणि चावे घेऊ लागला. इतर वाघांनी जिराफाच्या वेगवेगळ्या भागावर हल्लाबोल करून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला.
मान तुकवली नाही
वाघ किंवा सिंह जेव्हा शिकार करतात, तेव्हा प्राण्याच्या मानेवर हल्ला करतात. मानेचा चावा घेतल्यानंतर प्राण्याच्या जीव जातो आणि शिकार फत्ते होते. मात्र या जिराफानं आपली मानच न तुकवल्यामुळे वाघांना मानेपर्यंत पोहोचताच आलं नाही. आपल्यावर झालेल्या हल्ल्याला कुठलाही प्रतिसाद न देता वेदना सहन करत हा जिराफ केवळ आपल्या मार्गाने चालत राहिला. काही अंतर चालून गेल्यानंतर मात्र वाघांनी धीर सोडला आणि जिराफाचा नाद सोडून ते माघारी फिरले.
हे वाचा- Dating Website वर नव्हत्या मनासारख्या मुली, तरुणानं कंपनीलाच खेचलं कोर्टात
व्हिडिओ होतोय व्हायरल
एकाच वेळी सहा वाघांनी हल्ला चढवल्यानंतरही हार न मानणाऱ्या या जिराफाचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यूट्यूबवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger, Wild animal