Home /News /videsh /

Shocking VIDEO: ब्राझीलमध्ये दुर्घटना; धबधब्याजवळील भलामोठा खडक नौकेवर कोसळून 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

Shocking VIDEO: ब्राझीलमध्ये दुर्घटना; धबधब्याजवळील भलामोठा खडक नौकेवर कोसळून 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

धबधब्याजवळील भलामोठा खडक कोसळला; 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

धबधब्याजवळील भलामोठा खडक कोसळला; 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

rock fell on boat incident live video goes viral: धबधब्याजवळ असलेला कडा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.

    ब्राझील, 9 जानेवारी : धबधबा पाहिला की त्या धबधब्याच्या (Waterfall) जवळ जाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. मात्र, अशाच एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना (major accident) घडली आहे. तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड काळ बनून कोसळला (piece of stone fell down on boat) आहे. धबधब्याजवळील कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (rock fell on boat incident live video goes viral in social media) ही घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. ब्राझीलमधील झील तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ पर्यटक गेले होते. नौकेत बसून पर्यटक तेथील निसर्गरम्य परिस्थीतीचा आनंद घेत होते. त्याच दरम्यान धबधब्याजवळील एक भलामोठा दगड खाली कोसळला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथे अनेक नौका हौत्या यापैकी एक नौकेवर हा दगड पडला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 32 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दगड कोसळताच तेथे एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांचा जोरजोरात किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनास गेराइस येथे गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. वाचा : बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू,15 जण गंभीर जखमी तेथील पर्यटक शूट करत असताना त्या घटनेत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून ही दुर्घटना किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. दुर्घटनेनंतर 20 जण बेपत्ता या घटनेबाबत माहिती देताना लेफ्टनंट पेद्रो एहारा (Lieutenant Pedro Aihara) ने घटनेची माहिती देताना सांगितले की, धबधब्याजवळ मोटर बोट फिरत असताना अचानक खडक कोसळला आणि दुर्घटना घडली. घटनास्थळावरुन 32 जणांना बचावण्यात आले आहे. यापैकी 9 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले. अद्यापही काही पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे. अद्यापही 20 जण बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Brazil, Live video viral, Shocking viral video

    पुढील बातम्या