Home /News /maharashtra /

ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू,15 जण गंभीर जखमी

ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू,15 जण गंभीर जखमी

Beed st bus truck collied each other: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बीड, 9 जानेवारी : बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (ST bus major accident in Beed) झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. (ST bus and truck collied each other in Beed) बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला. एसटी बसमध्ये प्रवासी आणि एसटी चालक अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेन बोलवावा लागला. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजुला करुन आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: St bus, St bus accident

पुढील बातम्या