मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking Video : पार्टीमध्ये महिला पोलिसाचा बड्या अधिकाऱ्यासोबत अश्लील डान्स

Shocking Video : पार्टीमध्ये महिला पोलिसाचा बड्या अधिकाऱ्यासोबत अश्लील डान्स

या पार्टीनंतर अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आणि या प्रकरणावर तपास सुरू करण्यात आला आहे.

या पार्टीनंतर अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आणि या प्रकरणावर तपास सुरू करण्यात आला आहे.

या पार्टीनंतर अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आणि या प्रकरणावर तपास सुरू करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : संपूर्ण जगभरात नाताळ आणि नव वर्षांच्या सेलिब्रेशनची (New Year celebration) तयारी धुमधडाक्यात सुरू झाली आहे. यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका हॉलिडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागातील अनेक कर्मचारी आणि अधिकारी सामील झाले. मात्र पार्टीमध्ये लॅप डान्स पाहून वाद सुरू झाला. ज्यामुळे या मोठ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 44 व्या प्रीसिंक्ट ऑफिसर लेफ्टनंट निक मॅकगॅरी या पार्टीत सामील झाले होते. यादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत अश्लील लॅप डान्स केला. कोणीतरी याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोबतच पोलीस अधिकारीच्या या कृत्याबद्दल लोक टीकाही करीत आहेत.

हे ही वाचा-प्रेग्नेंट राहिली हुकूमशाहाच्या सैन्यातील महिला, भूल दिल्याशिवायच केला गर्भपातया व्हिडीओमध्ये लेफ्टनंट एक खुर्ची घेऊन बसतात. त्यानंतर छोटे कपडे घातलेली एक महिला त्यांच्याजवळ येते आणि लॅप डान्स करू लागते. यादरम्यान लेफ्टनंट तिला थांबवण्याऐवजी हसू लागला. यावेळी इतर लोकही टाळ्या वाजवतात आणि आरडाओरडा करू लागतात. यावेळी कोणी त्यावर टीका केली नाही. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्याला विरोध केला जात आहे.

हा अधिकारी विवाहित असून तो शहराच्या उत्तरेकडील भागात राहतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कोणत्याही महिला कर्मचाऱ्यासोबत असं कृत्य करणं चुकीचं असल्याची चर्चा केली जात आहे. जेव्हा महिला अधिकारी त्यांच्यासोबत डान्स करीत होती, यावेळी तिला हटवण्याऐवजी अधिकारीने तिला मिठी मारली. यामुळे पोलीस उच्च अधिकारी नाराज आहेत. या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

या पार्टीनंतर अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आणि या प्रकरणावर तपास सुरू करण्यात आला आहे. जेव्हा लेफ्टनंटकडून या प्रकरणात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता.

First published: