जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक! चीनमध्ये 8 कोटी लोक बेरोजगार, तब्बल 90 लाख तरुणांसमोर नोकरीचं संकट

धक्कादायक! चीनमध्ये 8 कोटी लोक बेरोजगार, तब्बल 90 लाख तरुणांसमोर नोकरीचं संकट

धक्कादायक! चीनमध्ये 8 कोटी लोक बेरोजगार, तब्बल 90 लाख तरुणांसमोर नोकरीचं संकट

चीनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने बेरोजगार झाले असतील तर भारतात काय होईल?

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 09 मे : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. चीनमध्ये (China) लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या जीवघेण्या आजारामुळे अनेक आठवडे मार्केटमध्ये लॉकडाऊन होता. त्यामुळे लाखो लोकांच्या हातचे काम गेले आहे. सध्या नोकरी गेलेल्यांचा नेमका आकडा सांगता येत नाही. कारण याबाबत पारदर्शी आकडा नाही. चीनमध्ये अधिकृत स्वरुपात बेरोजगारा आकडा नाही. गेल्या काही वर्षात हे प्रमाण 4 टक्क्यांहून 5 वर पोहोचलं आहे. मात्र गेल्या काही दिवसात बेरोजगारीची अधिकृत संख्या वाढली आहे. जर चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली असेल तर भारतातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर 5.9 टक्के इतका होता. त्यानंतर गेल्या महिन्यात हे प्रमाण 6.2 टक्के झालं. यानुसार गेल्या काही दिवसांत 2 कोटी 70 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये बेरोजगारीची संख्या खूप कमी करुन सांगतिली जात आहे. मात्र सद्य परिस्थिती खूप कठीण आहे. एका रिपोर्टनुसार चीनमध्ये तब्बल 29 कोटी प्रवासी मजूर आहेत, जे कन्स्ट्रक्शन, मॅन्यूफॅक्चरिंग आणि इतर प्रकारच्या कामाशी संबंधित आहेत. हे कमी उत्पन्न गटातील आहेत. मात्र अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ही संख्या एकत्र केल्यास चीनमध्ये मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 8 कोटी लोक बेरोजगार झाले आहे. चीन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सचे एक अर्थतज्ज्ञ झँग बिन यांनी ही आकडेवारी दिली आहे. दुसरीकडे य़ेत्या काही आठवड्यांमध्ये परिस्थिती अधिक बिघडू शकते. बीजिंगमधून तब्बल 87 लाख लोक अनेक कॉलेज व विद्यापीठातून पदवी घेऊ बाहेर पडतील. त्यांच्यासमोर नोकरीचं संकट असेल. सद्यपरिस्थितीत त्यांना नोकरी मिळणं अवघड आहे. संबंधित - लॉकडाऊनमधील वेदनादायक कहाणी, बापानेच 8 महिन्यांच्या बाळाची निर्घृणपणे केली हत्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात