मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

धक्कादायक! 2 माथेफिरूकडून धारदार शस्त्राने 25 जणांवर वार, 10 जणांचा मृत्यू 15 जखमी

धक्कादायक! 2 माथेफिरूकडून धारदार शस्त्राने 25 जणांवर वार, 10 जणांचा मृत्यू 15 जखमी

दोन माथेफिरूंनी धारदार शस्त्राने एक दोन नाही तर 20 हून अधिक लोकांवर सपासप वार केले. या माथेफिरूने केलेल्या कृत्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

कॅनडा, 5 सप्टेंबर : एखाद्या सिनेमात थरार पाहावा तशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. दोन माथेफिरूंनी धारदार शस्त्राने एक दोन नाही तर 20 हून अधिक लोकांवर सपासप वार केले. या माथेफिरूने केलेल्या कृत्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

कॅनडाच्या सस्कॅचेवान भागात वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर फरार आहे. पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. सास्काचेवान प्रांतातील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डन इथे घडलेल्या घटनेनंतर अलर्ट दिला आहे.

उत्तर पूर्व भागातील वेल्डन भागात छुप्या पद्धतीने चाकू हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. आरसीएमपीकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची डेमियन सँडर्सन आणि माइल्स सँडरसन ओळख पटली. या दोघांचा सध्या शोध सुरू आहे.

हेही वाचा- अंध व कर्णबधिर महिलेवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार, ऊसाच्या फडात ओढत नेत केलं दुष्कर्म

संशयित आरोपींचा हे हल्ले करण्यामागे काय हेतू होता याचं गुपित अजूनही उलगडलं नाही. आरसीएमपी सस्कॅचेवानच्या सहाय्यक आयुक्त रोंडा ब्लॅकमोर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांना ठरवून टार्गेट करण्यात आलं.

हेही वाचा-मैत्रिणीमुळे झाली कॉल गर्ल; 15 वर्षांच्या मुलीने सांगितलं हॉटेलच्या त्या खोलीतील घृणास्पद सत्य

काही जणांवर बेसावधपणे हल्ला करण्यात आला. त्यामुळे यामागचा हेतू स्पष्टपणे समजत नाही. ही घटना अत्यंत भयंकर आहे. जखमींची संख्या वाढत असल्याचं ब्लॅकमोर यांनी म्हटलं आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. आजूबाजूच्या भागांमध्येही अलर्ट देण्यात आला आहे.

First published:

Tags: Canada, Crime news