जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अंध व कर्णबधिर महिलेवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार, ऊसाच्या फडात ओढत नेत केलं दुष्कर्म

अंध व कर्णबधिर महिलेवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार, ऊसाच्या फडात ओढत नेत केलं दुष्कर्म

अंध व कर्णबधिर महिलेवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार, ऊसाच्या फडात ओढत नेत केलं दुष्कर्म

गातेगाव या गावात दोन अंध-मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 3 सप्टेंबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात बलात्कार, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील लातूर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अंध आणि मूकबधिर असलेल्या एका महिलेला ऊसाच्या फडात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - गातेगाव या गावात दोन अंध-मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. पीडिता आणि आरोपी हे दोन्ही शेजारी शेजारी राहतात. आरोपीचे नाव बाळासाहेब साबळे असे आहे. त्याने पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी बाळासाहेब हा गेल्या काही दिवसांपासून पीडिता आणि तिच्या बहिणीसोबत घरी येऊन छेडछाड करायचा. लातूर जिल्ह्यातील गातेगावमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केले. त्याने घराजवळील असलेल्या ऊसात ओढत नेऊन या महिलेवर अत्याचार केला. पिडीतेचा आरडा-ओरडा ऐकून काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता आरोपीने पळ काढला. याप्रकरणी गातेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा -  वाचनालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाचा खून हत्या, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली, नातेवाईकांचा आरोप पीडिता आणि तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरुवातीला गुन्हा दाखल करायला कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करायला वेळ लागला, असा आरोप नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, माणुसकीला काळिमा लावणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आरोपीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात