नवी दिल्ली, 14 एप्रिल : लैंगिक समाधान (Sexual pleasure) मिळवण्यासाठी काही वेळा वस्तूंचा वापर केला जातो; मात्र असा वस्तूंचा वापर जिवावरदेखील बेतू शकतो. ब्राझीलमध्ये (Brazil) अशीच एक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) अडकलेला लोखंडी डंबेल (Dumbell) बाहेर काढला. या व्यक्तीचं नाव कुठेही जाहीर करण्यात आलेलं नाही. 54 वर्षांच्या या व्यक्तीनं दोन किलोचा डंबेल स्वतः शरीरात घातला होता; मात्र दोन दिवसांनंतर असह्य वेदना सुरू झाल्याने तो रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी उपकरणांच्या मदतीनं डंबेल काढण्याचा प्रयत्न केला; पण तो न निघाल्याने शेवटी आत हात घालून डंबेल काढण्यात आला. `नवभारत टाइम्स`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ब्राझीलमध्ये 54 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन किलोचा डंबेल अडकून बसला होता. दोन दिवसांनंतर ओटीपोटात दुखणं, मळमळ आणि शौचास त्रास होऊ लागल्याने तो मनौस इथल्या रुग्णालयात (Hospital) गेला. डॉक्टरांनी रेक्टमची (गुदाशय) तपासणी केली असता त्यांना लक्षणांच्या अनुषंगानं कोणतीही गोष्ट आढळून आली नाही. `डेली मेल`ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी या व्यक्तीचा एक्स-रे काढण्याचा निर्णय घेतला. हे लैंगिक स्वरूपाचं विचित्र प्रकरण होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. रेक्टम (Rectum) आणि कोलन (आतडं) यांना जोडणाऱ्या भागात 8 इंच लांब एक डंबेल अडकल्याचं एक्स-रे मध्ये (X-Ray) दिसून आलं. त्यानंतर सर्जननी उपकरणांच्या मदतीनं हा डंबेल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यात अपयश आलं. अखेरीस डॉक्टरांनी हात घालून डंबेल बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा- भयंकर! टिकली लावली म्हणून पोलीस अधिकाऱ्याने प्राध्यापिकेला रोखलं; बाईकने चिरडण्याचा केला प्रयत्न `अनेकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं अशा रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती व्हावं लागतं. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दीर्घ काळ राहत नाहीत. परंतु, काही केसेसमध्ये शरीराच्या नाजूक भागांना इजा होण्याची शक्यता असते. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या अहवालानुसार, ब्रिटनमधल्या रुग्णालयांमध्ये 2010 ते 2019 दरम्यान रुग्णांच्या शरीरातून 3500 वस्तू बाहेर काढण्यात आल्या. त्यात टूथ ब्रश, मूर्ती, अंडी आदींचा समावेश होता,` असं डॉक्टरनी सांगितलं. या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला डंबेल बाहेर काढणं खूप अवघड होतं. परंतु, आम्हाला त्यात यश आलं. तीन दिवसांनी या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असं इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमधील केस रिपोर्टत डॉक्टरांनी लिहिलं आहे. डॉक्टर म्हणाले, `यापैकी बहुतेकशा प्रकरणांमध्ये रुग्ण हे 20 ते 40 वर्ष वयोगटातले `गोरे पुरुष` असतात. प्रायव्हेट पार्टमध्ये वस्तू अडकण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे लैंगिक इच्छेच्या पूर्तीसाठी केलेली कृती हे असतं.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.