जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / भयंकर! टिकली लावली म्हणून पोलीस अधिकाऱ्याने प्राध्यापिकेला रोखलं; बाईकने चिरडण्याचा केला प्रयत्न

भयंकर! टिकली लावली म्हणून पोलीस अधिकाऱ्याने प्राध्यापिकेला रोखलं; बाईकने चिरडण्याचा केला प्रयत्न

Representative Image

Representative Image

ही महिला एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ढाका, 4 एप्रिल : बांग्लादेशात (Bangladesh News) एका खासगी कॉलेजमधील महिला प्राध्यपकाने टिकली लावल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याने तिला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय जीवे मारण्याचीही धमकी दिली. एका माध्यमाने या गोष्टीचा रविवारी खुलासा केला. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रातील माहितीनुसार, येथे तेजगाव कॉलेजमध्ये थिएटर आणि मीडिया स्टडीजचे वक्ते लोटा सुमद्देर यांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी त्यांच्या कॉलेजजवळ झालेल्या या घटनेनंतर त्यांना असुरक्षित वाटत आहे. पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीनुसार, लोटाने सांगितलं की, बाईकवरून जाणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना टिकली लावण्यावरुन आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्रास दिला. भारतातील उपमहाद्वीपमध्ये श्रृगांर म्हणून महिला माथ्यावर टिकली लावतात. हे ही वाचा- California Firing Video : अमेरिकेतील भीषण गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी महिला प्राध्यापिकेने सांगितलं की, जेव्हा तिने पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याचा विरोध केला तर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. लोटा सुमद्देर पुढे म्हणाल्या की, पोलीस अधिकाऱ्याने बाईकवरुन त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र कसंबसं करीत तिने स्वत:ला वाचवलं. यात रस्त्यावर पडल्यामुळे त्यांना काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. शेर-ए-बांग्ला नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उत्पल बरुआ यांनी सांगितलं की, प्राध्यापकाचा आरोप आहे की, आरोपी पोलीस अधिकारीचं नाव लक्षात नाही. मात्र महिलेने बाईकचा क्रमांक पोलिसांना दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात