मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Babar Azam ची गर्लफ्रेंड असल्याचा या तरुणीचा दावा, 'कुराण'वर हात ठेवत म्हणाली-त्याने 10 वर्ष केलं लैंगिक शोषण; VIDEO

Babar Azam ची गर्लफ्रेंड असल्याचा या तरुणीचा दावा, 'कुराण'वर हात ठेवत म्हणाली-त्याने 10 वर्ष केलं लैंगिक शोषण; VIDEO

भारतावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विशेष चर्चेत आला आहे. दरम्यान त्याला या विजयाचा आनंद फार काळ घेता आला नाही. कारण स्वत:ला बाबरची प्रेयसी म्हणवणाऱ्या एका तरुणीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.

भारतावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विशेष चर्चेत आला आहे. दरम्यान त्याला या विजयाचा आनंद फार काळ घेता आला नाही. कारण स्वत:ला बाबरची प्रेयसी म्हणवणाऱ्या एका तरुणीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.

भारतावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विशेष चर्चेत आला आहे. दरम्यान त्याला या विजयाचा आनंद फार काळ घेता आला नाही. कारण स्वत:ला बाबरची प्रेयसी म्हणवणाऱ्या एका तरुणीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर: युनायटेड अरब अमिरातीमध्ये (युएई) सध्या टी-20 वर्ल्ड कपचं (ICC T20 World Cup 2021 Latest Update) धुमशान सुरू आहे. रविवारी (24 ऑक्टोबर 2021) भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच झाली. या मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव करून इतिहास रचला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पाकिस्तानच्या विजयाची जोरदार चर्चा आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप विजयाचं श्रेय पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam Latest News) दिलं जात आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये बाबर आझम सध्या हिरो ठरत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील त्याची स्तुती केली आहे. बाबर आझमला मात्र, आपल्या विजयाचा आनंद घेता आला नाही. कारण, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक जुना वाद पुन्हा समोर आला आहे. स्वत:ला बाबरची प्रेयसी म्हणवणाऱ्या एका तरुणीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे (Sexual abuse allegations on Babar Azam) आरोप केले आहेत.

हमिजा मुख्तार, असं नाव असलेल्या या तरुणीनं बाबर आझमवर लैंगिक शोषणासह विविध आरोप केले आहेत. 'डेली पाकिस्तान' या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, बाबरने हमिजाला लग्न करण्याचं आश्वासन देऊन 10 वर्षं तिचं लैंगिक शोषण केलं. आता त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. याशिवाय, ती बाबर आझममुळे गरोदर राहिली होती मात्र, त्याने तिचा गर्भपात करून घेतला, असा दावा या तरुणीनं केला आहे. हमिजा मुख्तारनं आता बाबर आझमविरोधात पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली असून, तिने त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. या पूर्वी देखील हमिजानं बाबरच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्यांनी तिला संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती.

वाचा-SRIvsBAN सामन्यात खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक; 'या' खेळाडूंवर ICC कडून कठोर कारवाई

हमिजाने याप्रकरणात काही दावे केले आहेत. तिच्या मते, किशोरवयीन असल्यापासून बाबर आणि हमिजा एकमेकांच्या प्रेमात होते. तेव्हा बाबर आझमनं व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवातदेखील केली नव्हती. त्यांच्या नात्याला कुटुंबियांची परवानगी नसल्यानं, एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी 2011मध्ये दोघे घरातून पळूनदेखील गेले होते. त्यानंतर लाहोरमधील विविध ठिकाणी हे दोघं सोबत राहिले होते, असाही दावा हमिजानं केला आहे. आपल्या आरोपांना आधार म्हणून हमिजानं पवित्र कुराणची शपथ घेऊन अनेक पुरावेदेखील सादर केले आहेत.

हमिजानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बाबर आझमनं तिला प्रमोज केलं आणि तिनं त्याचा स्वीकार केला होता. त्यानं तिला लग्नाचं वचन दिलं होतं. त्याच्या आधारावर गेल्या 10 वर्षांपासून त्यानं तिचं लैंगिक शोषण केलं. त्यातून तिला दिवस राहिले. ही बाब जेव्हा तिनं बाबरच्या कानावर घातली तेव्हा त्यानं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं तिचा गर्भपात करून घेतला. 2017 मध्ये त्याने त्याचा फोन नंबरदेखील बदलून टाकला. त्यानंतर देखील तीन वर्षे त्यानं तिचा गैरफायदा घेतला. 2020 मध्ये त्यानं तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, असे अनेक आरोप हमिजानं केले आहेत.

वाचा-‘जीत गये…' INDvsPAKसामन्यानंतर 'ते' WhatsApp Status ठेवणं शिक्षिकेला पडलं महागात

क्रिकेट कारकिर्दीचा विचार केल्यास, बाबर आझम हा पाकिस्तानच्या टेस्ट, वन-डे आणि टी-ट्वेंटी क्रिकेट टीमचा कर्णधार असून त्यानं आतापर्यंत एकूण 33 टेस्ट खेळल्या आहेत. टेस्टमध्ये आतापर्यंत त्यानं 42. 53 च्या सरासरीने 2 हजार 169 रन केल्या आहेत. 80पेक्षा जास्त वन-डे सामने खेळलेल्या बाबरच्या नावे 56.84च्या सरासरीनं 3 हजार 808 रन्स आहेत. याशिवाय टी-टी क्रिकेटमध्ये त्यानं 54 सामने खेळले असून 47.33 च्या सरासरीने 2 हजार 35 रन्स केल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळं त्याची तुलना भारताचा कॅप्टन विराट कोहलीशी देखील केली जाते.

क्रिकेटमध्ये यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेला बाबर आझम एका तरुणीनं केलेल्या आरोपांमुळं आता संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे बाबर आझमच्या विरोधात लाहोर हायकोर्टात ब्लॅकमेल आणि अत्याचाराचं एक प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आता हमिजानं पुन्हा त्याच्यावर आरोप केल्यानं त्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. जून 2021 मध्ये बाबर आझमनं आपल्या नात्यातील एका मुलीशी साखरपुडा केला आहे. ती मुलगी नात्यानं त्याची चुलत बहीण लागत असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती

First published:

Tags: Babar azam, India vs Pakistan, Pakistan Cricket Board, T-20 cricket, T20 world cup