यापूर्वीही झाले होते हल्ले काबुल विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात असताना विमानतळ परिसरात जोरदार बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यात काही अमेरिकी सैनिक आणि इतर अनेक सर्वसामान्य नागरिकांचे प्राण गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस-के या संघटनेनंच स्वीकारली होती. त्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता तालिबान सरकारची स्थापना झाली आहे. तालिबान सरकारला अस्थिर कऱणे आणि तालिबानचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आयसीसी-के संघटनेनेच हे हल्ले केले असावेत, असा अंदाज आहे. दुसरीकडे तालिबान आणि पंजशीरमधील नॉर्दर्न अलायन्स यांच्यात अजूनही संघर्ष सुरू आहे. तालिबानकडून पंजशीरमधील नागरी वस्तीत हल्ले करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचं प्रत्युत्तर म्हणून नॉर्दर्न अलायन्सच्या सैनिकांकडून हे हल्ले घडवण्यात आल्याची चर्चादेखील केली जात आहे. या हल्ल्यात किती जण गंभीर आहेत आणि नेमकं काय नुकसान झालं आहे, याचे तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मात्र अफगाणिस्तानात सर्व काही आलबेल नसल्याचंच या घटनेवरून दिसून आलं आहे.#تازه اصابت چندین راکت در خیرخانه کابل مردم محل این رویداد را به آماج نیوز تایید نموده و میگویند که چندین فیر راکت در ساحه سب استیشن برق چمتله کابل اصابت نموده است. تاهنوز در مورد خسارات و تلفات این رویداد جزییاتی در دسترس نیست.#آماج_نیوز pic.twitter.com/19rnIAc5EU
— Aamaj News (@AamajN) September 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Attack, Kabul