युक्रेन, 24 फेब्रुवारी: Russia-Ukraine War: युक्रेन-रशियामधील (Ukraine and Russia) तणावादरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या सैन्यानं आपले शस्त्र खाली ठेवावे. यानंतर युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोट (explosions) होत असल्याच्या बातम्या येत आहेत. AFP नं दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देत, रशियाचा त्यावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलंय. पण जर बाहेरून धोका असेल तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं जाईल. यासोबतच रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे 2 लाख सैनिक तैनात केले आहेत. इकडे युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेस्सा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेननं देशव्यापी आणीबाणी घोषित दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेननं बुधवारी देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली. दरम्यान पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली आणि मॉस्कोनं युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या देशव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या आदेशाला मान्यता दिली आहे जी गुरुवारपासून 30 दिवस चालेल.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे रशियाला भावनिक आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी टीव्हीवर थेट येऊन रशियाला लष्करी आदेश देण्यापूर्वी सीमेवर सतत वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान युद्ध टाळण्याचं उत्कट आवाहन केलं. त्यांनी रशियन लोकांना रशिया-युक्रेनच्या सामायिक इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून दिली. जेलेन्स्की म्हणाले की, त्यांनी व्लादिमीर पुतिन यांना देखील कॉल केला होता. मात्र कोणतेही उत्तर मिळाले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या देशाला शांतता हवी आहे.