• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • जगातलं दुसरं सर्वोच्च शिखर असलेल्या PoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण

जगातलं दुसरं सर्वोच्च शिखर असलेल्या PoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण

के-टू शिखर (K2 Summit) सर करण्याच्या प्रयत्नात याच वर्षी आतापर्यंत तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. 2018 सालीही रिक अ‍ॅलन पाकिस्तानातल्या एका शिखरावर एकट्याने चढाई करत असताना बर्फाच्या कड्यावरून कोसळले होते. पण ड्रोनच्या माध्यमातून त्यांना शोधून वाचवण्यात यश आलं होतं. पण या वेळचा Avalanche जीवघेणा ठरला.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 जुलै: हिमालयातल्या माउंट एव्हरेस्टनंतर (Highest mountain peak in the world) जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर (2nd tallest peak in world) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के-टू (उंची 8611 मीटर) (K2) या काराकोरम (Karakoram Range) पर्वतरांगेतल्या शिखरावर चढाई करण्याच्या प्रयत्नात असताना हिमस्खलन (Avalanche) झाल्यामुळे रिक अ‍ॅलन या प्रसिद्ध आणि अनुभवी स्कॉटिश गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. रिक अ‍ॅलन हे स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक 68 वर्षांचे होते. पार्टनर्स रिलीफ अँड डेव्हलपमेंट चॅरिटीसाठी (Partners Relief & Development UK) निधी उभा करण्याकरिता रिक यांनी के-टू शिखर (K2 Summit) सर करण्याची मोहीम आखली होती; मात्र त्यादरम्यान तीन दिवसांपूर्वी त्यांचा  मृत्यू झाला. पार्टनर्स रिलीफ अँड डेव्हलपमेंट चॅरिटीच्या फेसबुक पोस्टच्या हवाल्याने 'दी गार्डियन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या वेळी रिक अ‍ॅलन (Rick Allen) यांनी चढाईसाठी वेगळा आणि पूर्वी कधीही न वापरला गेलेला मार्ग निवडला होता. पर्वताच्या नैर्ऋत्य दिशेने झालेल्या हिमस्खलनात ते सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. स्पेनचे जॉर्डी टोसास आणि ऑस्ट्रियाचे स्टीफन केक हे दोघे गिर्यारोहकही (Mountaineers) त्यांच्याबरोबर होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि... 'आपल्या सर्वाधिक आवडीची गोष्ट करताना रिक यांना मृत्यू आला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अतुलनीय धैर्याने कार्य केलं. रिक यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या सहवेदना आहेत,' असं पार्टनर्स रिलीफ अँड डेव्हलपमेंट चॅरिटीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. म्यानमारमधून विस्थापित झालेल्या मुलांच्या आरोग्यविषयक आणि शिक्षणविषयक गरज पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करत असून, रिक अॅलन हे त्या संस्थेचे ट्रस्टी होते. ड्रोनच्या माध्यमातून या दुर्घटनेची माहिती कळली. त्यानंतर रिक यांच्या साथीदारांना वाचवण्यात आलं. 2018 सालीही रिक अ‍ॅलन पाकिस्तानातल्या एका शिखरावर एकट्याने चढाई करत असताना बर्फाच्या कड्यावरून कोसळले होते. 8074 मीटर उंचीच्या त्या शिखराचा जगात 12वा क्रमांक लागतो. त्या वेळी रिक अ‍ॅलन यांचा मृत्यू झाला, असंच सर्वांना वाटलं होतं; मात्र त्यानंतर ड्रोनच्या (Drone) साह्याने त्यांना शोधण्यात आणि वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. तेव्हाही ते काराकोरम पर्वतरांगेतल्याच शिखरावर चढाईच्या प्रयत्नात होते. याच वर्षी के-टू शिखरावरच्या चढाईदरम्यान पाकिस्तानी गिर्यारोहक अली सादपारा, आइसलँडचे जॉन सनोरी आणि चिलीचे जुआन पाब्लोमोहर यांचा मृत्यू झाला होता. तसंच, गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियातले गिर्यारोहक किम होंग बिन हेदेखील याच पर्वतरांगेत खराब हवामानानंतर बेपत्ता झाले असून, त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. हा तर Real life बाहुबली, एकीकडे दरी..दुसरीकडे डोंगर; Video पाहून हैराण व्हाल! रिक अॅलन शेवटी ज्या मोहिमेवर होते, त्या मोहिमेतून 10 हजार पौंड निधी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. अॅलन यांच्या मृत्यूची बातमी येईपर्यंत 170 पौंड निधी जमा झाला होता. रिक यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर रविवारी सायंकाळी (25 जुलै) हा निधी 1200 पौंडांपर्यंत पोहोचला होता. 26 जुलै रोजी हा निधी 3388 पौंडांपर्यंत पोहोचला आहे.
First published: