जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह करीत होते मजा-मस्ती; अचानक पाणी पातळी वाढली आणि चित्रचं पालटलं

VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह करीत होते मजा-मस्ती; अचानक पाणी पातळी वाढली आणि चित्रचं पालटलं

VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह करीत होते मजा-मस्ती; अचानक पाणी पातळी वाढली आणि चित्रचं पालटलं

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ येथील एका पर्यटकाने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अलीराजपुर, 26 जुलै : सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहे. महाराष्ट्रात तर अतिवृष्टीमुळे 150 हून नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान अलीराजपुरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कट्ठिवाडा येथील एका धबधब्याचा आहे. धबधब्याखाली नागरिक आनंद घेत होते. (VIDEO Having fun with the kids under the waterfall Suddenly the water level rose and the picture changed) अनेक कुटुंब, आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. व्हिडीओच्या सुरुवातील अनेक नागरिक येथे मजामस्ती करताना दिसत आहे. मात्र काही वेळानंतर मात्र येथील चित्रच पालटलं. अचनक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. धबधब्याचा वाढलेला वेग पाहून नागरिकांनी बाजूला होण्यास सांगण्यात आलं. वेळेत पर्यटक बाजूला झाल्यामुळे येथे जीवितहानी झालेली नाही. व्हिडीओ पाहून तुम्हाला येथील तीव्रता लक्षात येईल. हे ही वाचा- हा तर Real life बाहुबली, एकीकडे दरी..दुसरीकडे डोंगर; Video पाहून हैराण व्हाल!

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता सध्या कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील दोन दिवस कोकणात हीच स्थिती कायम राहणार आहे. पण आजपासून चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच 29 आणि 30 जुलै रोजी कोकणात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात