नवी दिल्ली 14 मे: कोरोनाविरूद्धच्या लढाईत शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. कोरोनावर औषध जरी मिळालं नसलं तरी कोरोनाला रोखण्यासाठी आता काही गोष्टींचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. याच लढाईत अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक खास PPE किट तयार केलं आहे. टेक्सस्टाईल कोटिंग केलेल्या किट मुळे व्हायरस मास्क, हेल्मेट आणि गाऊस पासून दूर ठेवण्यात यश आलं असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला. त्यामुळे कोरोनाविरुद्ध आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर हेल्थ वर्कर्सना मोठा फायदा होणार आहे.
अमेरिकन केमिकल सोसाइटी च्या (American Chemical Society) जर्नलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही खास किट धुता येणारी आहे. त्यामुळे त्याचा पुर्नवापर करता येणार आहे. कोरोनाच्या पेशंट्सना हाताळने ही एक मोठी जोखीम असते. त्या हेल्थ वर्करला किंवा डॉक्टर्सना बाधा होण्याची शक्यता असते.
आत्तापर्यंत अनेक डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. ही हानी टाळण्यासाठी आता या किटचा वापर होणार आहे.
भारताततही आता PPE किट्स तयार करण्यात येत आहेत. सुरुवातीला भारतात या किट्स तयार होत नव्हत्या. त्यामुळे त्या चीन किंवा इतर देशांमधून आयात कराव्या लागत होत्या. भारताने सुरूवातीला ५२ हजार किट्स आयात केल्या होत्या. आता मात्र देशातच दररोज ३ लाख पीपीई किट्स तयार होत आहेत.
Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली होती अवस्था
चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांनंतरही कोरोनावर कोणतीही लस किंवा ठोस उपाय शोधता आलेला नाही आहे. यातच जागितक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला. मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल.
येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, 'हा' आजार ठरणार कारण
डब्ल्यूएचओचे आणीबाणीविषयक प्रकरणांचे संचालक मायकेल रायन यांनी बुधवारी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, "कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊ शकतो, जो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि कधीच संपू शकत नाही." एचआयव्हीचे उदाहरण देत ते म्हणाले की हा व्हायरसही संपलेला नाही आहे. मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार लस नसल्यास सामान्य लोकांना रोगाविषयी योग्य प्रमाणात प्रतिकारशक्ती मिळण्यास अनेक वर्षे लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.