जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / शास्त्रज्ञाने स्वतःच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया, काय आहे कारण?

शास्त्रज्ञाने स्वतःच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया, काय आहे कारण?

 शास्त्रज्ञाने स्वतःच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया

शास्त्रज्ञाने स्वतःच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया

कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं, की ते खूप कौशल्याचं आणि अत्यंत कठीण काम असतं. कारण जराही चूक झाली, तरी थेट जिवावरच बेतू शकतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 जुलै : कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं, की ते खूप कौशल्याचं आणि अत्यंत कठीण काम असतं. कारण जराही चूक झाली, तरी थेट जिवावरच बेतू शकतं. त्यातही ब्रेन सर्जरी अर्थात मेंदूची शस्त्रक्रिया असेल, तर ती अधिकच गुंतागुंतीची असते. त्यामुळेच अत्यंत अनुभवी, उच्चशिक्षित डॉक्टर्सच ब्रेन सर्जरी करतात. या पार्श्वभूमीवर, रशियातल्या एका वादग्रस्त शास्त्रज्ञाने अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. स्वतःच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये स्वतःवरच ब्रेन सर्जरी केली, असं त्याचं म्हणणं आहे. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मायकेल रादुगा या नावाचा हा रशियन वैज्ञानिक आहे. त्याच्याकडे न्यूरोसर्जरीचं कोणतंही क्वालिफिकेशन नाही. तरीही त्याने असा दावा केला आहे, की कजाहस्तानमधल्या घरी त्याने स्वतःचीच ब्रेन सर्जरी केली. त्यात त्याचं एक लिटर रक्त वाहून गेलं, असंही त्याने सांगितलं आहे. स्वप्नांचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी ल्युसिड ड्रीम्स म्हणजे अशी स्वप्नं असतात, जी स्वप्नं पाहत असताना संबंधित व्यक्तीला याची कल्पना असते, की आपण स्वप्न पाहतोय. ही ल्युसिड ड्रीम्स नियंत्रित करण्याच्या उद्देशाने आपण ब्रेन सर्जरी केल्याचं मायकेलने सांगितलं. डेली मेलने त्याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मायकेल रादुगा हा व्यवसायाने डॉक्टर नाही; मात्र तो फेज रिसर्च सेंटरचा संस्थापक आहे. त्या संस्थेचा असा दावा आहे, की ती संस्था कोणत्याही व्यक्तीला स्लीप पॅरालिसिस, शरीरातून बाहेर येण्याचा अनुभव, तसंच एस्ट्रल प्रोजेक्शनचा अनुभव कसा असतो, याबद्दल प्राथमिक मार्गदर्शन करू शकते. रशियात रादुगाचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत; मात्र अनेक न्यूरोसर्जन्सनी असा इशारा दिला आहे, की रादुगा अत्यंत धोकादायक काम करत आहे. एक जोडपं असंही! कारने 116 देशांचा केला प्रवास, आता वर्ल्ड रेकॉर्ड नावावर मायकेल रादुगा याने स्वतःही ही गोष्ट मान्य केली आहे, की स्वतःच केलेल्या स्वतःच्या ब्रेन सर्जरीनंतर 30 मिनिटांनी तो पराभव स्वीकारण्यास तयार होता. कारण त्याचं जवळपास एक लिटर रक्त या सर्जरीमध्ये वाहिलं होतं. त्यामुळे बेशुद्ध पडण्याची भीतीही होती; मात्र नंतर तो सर्जरी पूर्ण करण्यात कथितरीत्या यशस्वी ठरला असा दावा त्याने केला आहे. त्यानंतर त्याने आंघोळ केली. एवढंच नव्हे, तर त्यानंतर त्याने काय केलं आहे हे कोणालाही कळू न देता तो सलग 10 तास काम करत राहिल्याचं त्याचं म्हणणं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सल्लागार असलेले न्यूरोसर्जन अ‍ॅलेक्स ग्रीन यांनी म्हटलं आहे, की ‘रादुगाने केलेलं कृत्य करणं अत्यंत धोकादायक आहे.’ ‘यात सर्व प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्याच्या कॉर्टिकल नर्व्हमधून किंवा इंट्रासेरेब्रेल व्हेसलमधून रक्तस्राव झाला असता, तर त्याला कायमस्वरूपाचा स्ट्रोक आला असता किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकला असता,’ असंही ग्रीन यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात