लाँग ड्राईव्ह किंवा रोड ट्रिप सर्वांनाच आवडतात. एका जोडप्याला रोड ट्रिप इतकी आवडते की त्यांनी त्यांच्या कारमध्ये जगभर प्रवास केला. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)
जेम्स रॉजर्स आणि पायगे पार्कर जोडप्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. आता जाणून घेऊया या जोडप्याच्या अनोख्या प्रवासाबद्दल. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)
GWR अहवालानुसार, रॉजर्स आणि पेज यांनी त्यांच्या कारसह 116 देशांना भेट दिली आहे. त्याचा प्रवास 1 जानेवारी 1999 रोजी आईसलँडमध्ये हार्ड टॉप कन्व्हर्टिबल कारमधून सुरू झाला. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)
वेगवेगळ्या देशांमध्ये लोक काय करतात हे या जोडप्याला जाणून घ्यायचं होतं. त्यांचा दौरा 5 जानेवारी 2002 पर्यंत चालू होता. ते सर्व सहा खंडांमध्ये पोहोचले. जेम्स म्हणाले, प्रत्येक दिवस अनोखा आणि रोमांचक होता. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)
जोडप्याने धोकादायक डोंगरी रस्त्यावरून युद्धग्रस्त भागात जाण्याचा अनुभव घेतला. या जोडप्याचा दावा आहे की यादरम्यान त्यांना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक भेटले. वाळवंटात आणि जंगलात फिरले. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)
जेम्स म्हणाले की त्यांनी आणि पेजने त्यांच्या अनोख्या प्रवासात किती खर्च केला याची त्यांना कल्पना नाही. पण आपल्या आयुष्यात आलेल्या या सुंदर आठवणी आपण कधीच विसरणार नाही. (Photo credit: www.guinnessworldrecords.com)