रियाध, 1 एप्रिल: आखाती देशांतील (Middle East) अनेक श्रीमंत देशांपैकी एक म्हणजे सौदी अरेबिया (Saudi Arabia ban use of word maid). या देशाला खनिज तेलांच्या विक्रीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं त्यामुळे तो देश जगातील श्रीमंत देशांपैकी एकही समजला जातो. सौदी अरेबियाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सरकारनी वेळोवेळी घेतलेले निर्णय. काही वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियातील महिलांवर प्रचंड बंधनं होती. त्यांना सार्वजनिक आयुष्यात ही बंधनं पाळवीच लागत. आता इथलं सरकार या नियमांत शिथिलता आणत असून महिलांना कार चालवायला परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही चांगले निर्णय या सरकारने घेतले आहेत. तुम्ही म्हणाल सौदी अरेबियाबद्दल इतकी माहिती आम्ही का सांगतोय? त्याचं कारणही तसंच आहे. आता सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने नवा आदेश काढला आहे. तोही घरकामगारांच्या सन्मानाशी संबंधित आहे. परदेशातून घरकामारांना सौदी अरेबियात बोलवताना देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये या कामगारांचा उल्लेख इंग्रजीतील मेड (Maid) असा करू नये. त्यामुळे या परदेशी घरकामगारांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो त्यामुळे जाहिरातींमध्ये असे उल्लेख टाळावते असं वाणिज्य मंत्रालयाने (The Ministry of Commerce) आपल्या आदेशात म्हटलं आहे. सौदी गॅझेटच्या वेबसाइटवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातींमध्ये परदेशातील घरकामगारांना उद्देशून “servant or maid servant” म्हणजे कामगार किंवा घरकामगार हे शब्द वापरण्याऐवजी “worker or female worker” म्हणजे कर्मचारी किंवा महिला कर्मचारी असे शब्द वापरावेत. The term shall be used in place of words such as या जाहिरातील त्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सेवांसाठी “to sell, to buy, and dispose of म्हणजे विक्री, खरेदी किंवा विल्हेवाट लावणे असे शब्द न वापरता “transfer of services” सेवा घेतल्या जातील असाच उल्लेख करावा असं सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने पत्रकात स्पष्ट केलं आहे. शांतताप्रिय न्यूझीलंडमधून धक्कादायक बातमी! भारतीय दाम्पत्याला ऑकलंडमध्ये भोसकलं कोणत्याही जाहिरातीमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो, ओळखपत्र, राहण्याचं परमीट (iqama) किंवा त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये. कर्मचारी, घरगुती कर्मचारी आणि याच गटातील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसंबंधी जाहिरातींसाठी हे नवे नियम लागू असतील, असेही यात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने दिलेल्या सेवेच्या बदल्यात त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक उचलावा लागेल अशी तरतूद कोणत्याही जाहिरातीमध्ये कोणत्याही परिस्थितीत असता कामा नये. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात कोणत्याही रकमेच्या बिलाची मागणी त्या कर्मचाऱ्याकडे नोकरी देणाऱ्याने करू नये असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कर्मचाऱ्याने सेवा द्यायला सुरू करण्यापूर्वी त्याची यासाठी परवानगी असायला हवी असंही या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.