जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / नवलच! सौदी अरेबियातील विद्यार्थी शिकणार रामायण आणि महाभारत

नवलच! सौदी अरेबियातील विद्यार्थी शिकणार रामायण आणि महाभारत

नवलच! सौदी अरेबियातील विद्यार्थी शिकणार रामायण आणि महाभारत

सौदी अरेबियानं रामायण (Ramyana) आणि महाभारत (Mahabharat) या हिंदू महाकाव्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. भारतीय संस्कृतीचा मुख्य भाग असलेल्या आयुर्वेदाच्या (Ayurveda) शिक्षणावरही नव्या अभ्यासक्रमात भर दिला जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : जगातील प्रमुख मुस्लीम देश असलेल्या सौदी अरेबियानं (Saudi Arabia) विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. पश्चिम आशियातील (West Asia) या देशानं  रामायण (Ramyan) आणि महाभारत (Mahabharat) या हिंदू महाकाव्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. सौदी अरेबियाचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान (Mohammed Bin Salman) यांच्या व्हिजन 2030 (Vision 2030) अनुसार हा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अन्य देशातील इतिहास, वेगवेगळ्या संस्कृती यांची माहिती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ‘इंडिया टुडे’ नं दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांना या व्हिजन अंतर्गत रामायण आणि महाभारत शिकवलं जाणार आहे. यामुळे त्यांच्या सांस्कृतिक ज्ञानात भर पडेल. भारतीय संस्कृतीचा मुख्य भाग असलेल्या आयुर्वेदाच्या (Ayurveda) शिक्षणावरही नव्या अभ्यासक्रमात भर दिला जाणार आहे. सौदी अरेबियाच्या इंग्रजीचं शिक्षण देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. सौदी अरेबियानं नव्या शिक्षण पद्धतीबात घेण्यात येणारे सर्व आक्षेप फेटाळले आहेत. सर्वसमावेशक, उदार आणि सहिष्णू  समाजचं भविष्य घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी पडेल अशी भावना Nouf-al-Marwai या ट्विटर युझरनं व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या मुलाच्या अभ्यासक्रमाचा स्क्रीन शॉट देखील ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा समावेश आहे. (वाचा :  EXPLAINER: अमेरिकेत तिसऱ्या महत्त्वाच्या पदी भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता; का आहे ही निवड ऐतिहासिक? ) “माझ्या शाळेतील मुलाच्या सोशल स्टडीज या विषयाच्या अभ्यासक्रमाचा हा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, रामायण, महाभारत, कर्म आणि इतिहास यांचा समावेश आहे. या विषयाांचा अभ्यास माझ्यासाठी देखील उपयोगी ठरत आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात