• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • सत्ता सोडता सोडवेना, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी पराभूत होताच ठोकलं संसदेला टाळ

सत्ता सोडता सोडवेना, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी पराभूत होताच ठोकलं संसदेला टाळ

एप्रिल महिन्यात सामोआमध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 मे: सत्ता, मग ती कोणत्याही बाबतीतली असो, ती अशी गोष्ट आहे, की भल्याभल्यांना तिचामोह सोडवत नाही. एखाद्या देशाची सत्ता हाती असेल तर मग बघायलाच नको. याचा प्रत्यय सामोआ (Samoa) या छोट्याशा देशाच्या निवडणुकांनंतर नुकताच आला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत या देशाच्या नागरिकांनी 22 वर्षं या देशाची सत्ता हाती असलेल्या पंतप्रधानांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसंच, प्रथमच एका महिलेच्या हाती देशाचं सत्ता  दिली आहे. मात्र 22 वर्षं घेतलेली सत्तेची ऊब मावळत्या पंतप्रधानांना सोडवत नसल्यामुळे अभूतपूर्व पेच प्रसंग उभा राहिला आहे. ह्युमनराइट्स प्रोटेक्शन पार्टी (HRPP) या पक्षाची सामोआवर गेली 40 वर्षं सत्ता आहे. त्यापैकी 22 वर्षं ट्विलाएपा सॅलेले मॅलिलेगाओई (Tuilaepa Sailele Malielegaoi) हे देशाचे पंतप्रधान आहेत. यंदा एप्रिल महिन्यात तिथेनिवडणुका झाल्या. त्यात सत्ताधारी पक्षाची हार झाली. फास्ट पार्टीने ही निवडणूक जिंकली आणि नाओमी मताफा (Fiame Naomi Mata'afa) या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ...मात्र 22 वर्षं सत्तेवर असलेल्या मॅलिलेगाओई हे आपला पराभव स्वीकारू शकले नाहीत. त्यांना आपला पराभव मान्य नसल्याने त्यांनी चक्क संसदेलाच टाळं ठोकलं. तसंच, स्वतः पदावरून पायउतार होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोमवारी (24मे) संसदेबाहेर एक तंबू उभारून नवनिर्वाचित पंतप्रधान नाओमी मताफा यांनी पदाची शपथ घेतली. मॅलिलेगाओई यांनी हा समारंभ अनधिकृत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या गावात उरलेलं नाही एकही किराणा दुकान; अशा पूर्ण करतात रोजच्या गरजा एप्रिल महिन्यात सामोआमध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली. ह्युमन राइट्स प्रोटेक्शनपार्टी आणि फास्ट पार्टी (Fast Party) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 25 जागा मिळाल्या. एका अपक्ष उमेदवाराने फास्ट पार्टीला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे फास्ट पार्टीचा विजय झाला. दरम्यान, एचआरपीपी या पक्षाने सत्ताहातची जाऊ न देण्यासाठी कोर्टात धाव घेतली आणि फास्ट पार्टीकडून महिला उमेदवारांच्या आरक्षणाचं पालन नीट करण्यात आलं नसल्याचा दावा केला. त्यानंतर तिथल्या निवडणूक आयोगाने एप्रिलमध्ये झालेल्या मतदानाचा निकाल रद्द झाल्याचं जाहीर केलं आणि 21 मे रोजी पुन्हा निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलं; मात्र त्याच्या पाच दिवस आधी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, की झालेल्या निवडणुका वैध आहेत. त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची आवश्यकताच उरली नाही. त्यामुळे एचआरपीपीची निराशा झाली. सामोआ हा प्रशांत महासागरातला छोटा, बेट स्वरूपाचा देश असून, 1962 साली तो न्यूझीलंडकडून मुक्त झाला. 1997 पर्यंत हा देश वेस्टर्न सामोआ नावाने ओळखला जात असे.
  First published: