• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • या गावात उरलेलं नाही एकही किराणा दुकान; अशा पूर्ण करतात रोजच्या गरजा

या गावात उरलेलं नाही एकही किराणा दुकान; अशा पूर्ण करतात रोजच्या गरजा

जगातील सर्वाधिक डिजीटल देशांपैकी एक देश असलेल्या स्वीडनमध्ये (Sweden) 92 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळं इथे, डिजिटल व्यवहार अगदी सहजपणे होतात. त्यामुळेच सध्याच्या कोरोना काळातही डिजिटल स्टोअर्सची संकल्पना इथं गावागावात रुजत आहे.

 • Share this:
  स्टॉकहोम, 24 मे : जगातील सर्वाधिक डिजीटल देशांपैकी एक देश असलेल्या स्वीडनमध्ये (Sweden) 92 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळं इथे, डिजिटल व्यवहार अगदी सहजपणे होतात. त्यामुळेच सध्याच्या कोरोना काळातही डिजिटल स्टोअर्सची संकल्पना इथं गावागावात रुजत आहे. गेल्या काही वर्षात इथल्या ग्रामीण भागातील (Rural Area) किराणा दुकानं (Grocery Store) एकामागून एक बंद पडत असून, लोकांना सामान आणण्यासाठी अनेक मैल चालत जावं लागत आहे. त्यामुळे इथे मोबाइल किंवा फिरत्या कंटेनरमधील सुपरमार्केटची (Mobile or Moving Digital Supermarket) कल्पना लोकप्रिय होत आहे. स्टॉकहोमपासून (Stokholm) 80 किमी अंतरावर असलेल्या वेकहोम (Wakeholm) गावातलं शेवटचं किराणा दुकानही नुकतंच बंद पडलं. त्यामुळे या गावातील लोकांना आपली गाडी घेऊन दूर अंतरावर असलेल्या सुपरमार्केटमध्ये जायला लागायचं. मात्र त्यांची ही समस्या दूर केली एका स्वयंचलित किराणा दुकानानं. जुलै 2020 मध्ये या गावात हे स्वयंचलित किराणा (Digital Store) दुकान सुरू झालं. गावातील एका मध्यवर्ती मैदानात कंटेनरमधील 20 चौरस मीटर आकारातील हे सुपरमार्केट 24 तास खुलं असतं. इथं सगळं काही मिळतं; पण इथं कॅशियरसुद्धा नाही. याबाबत एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना एक ग्राहक ग्युलिया रे म्हणाल्या की, काही काळ गावात किराणा दुकानाची कसलीच सोय नव्हती; परंतु आता बरीच सोय झाली आहे. इथं येणारे ग्राहक त्यांच्याकडे असलेल्या अ‍ॅपच्या सहायानं या दुकानाचे दरवाजे उघडतात. आठवड्यातून तीन वेळा येऊन ग्राहक आवश्यक सामान खरेदी करतात. काही ग्राहकांच्या मते, थोडं महाग पडतं; पण वेळ खूपच वाचतो हेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहक त्याच्या फोनच्या अ‍ॅपवर पिझ्झा आणि सोडा स्कॅन करतात, जे त्यांचं बँक खाते आणि राष्ट्रीय ओळख प्रणालीशी जोडलेले असतं. हे सर्व काम तिथे बसविण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेर्‍याच्या देखरेखीखाली होतं. खर्च कमी करण्याचे उद्दीष्ट गेल्या 25 वर्षांत स्वीडनमधील अनेक छोटी किराणा दुकाने (Grocery Stores) बंद पडली असून, या काळात सुपरस्टोअर्सची संख्या तिप्पट वाढली आहे. फायदेशीर ठरत नसल्यानं युरोपच्या इतर भागांप्रमाणेच ग्रामीण भागातील सुपरस्टोअर्सही बंद पडली आहेत. त्याचवेळी, गेल्या दोन वर्षांमध्ये स्वीडनच्या ग्रामीण भागात लिफव्हीएससारखी स्वयंचलित दुकाने लोकप्रिय ठरत आहेत. याबाबत लिफव्हीएसचे (Lifvs) सह-संस्थापक, डॅनियल लुंड म्हणाले की, आम्हाला आमच्या दुकानातील मालाची किंमत कमी ठेवायची आहे, त्यामुळे दुकानासाठी येणारा खर्च कमी असणं आवश्यक आहे. म्हणून दुकानाचा आकार लहान असून तिथे एकही कर्मचारी नाही. या गावाचे महापौर (Mayor) पीटर बुक या अभिनव दुकानाबाबत खूपच आशावादी आहेत. त्यांच्या मते, अशा दुकानांमुळे खूपच चांगली सोय झाली आहे. या निमित्तानं लोक एकमेकांना भेटतातही. सध्याच्या कोविड-19 च्या साथीमुळे गर्दी टाळण्यासाठीही अशा स्टोअरचा चांगला उपयोग होऊ शकतो. या दुकानामुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळत आहे. एक एक व्यक्ती आपलं सामान घेण्यासाठी आत जाते आणि बाहेर आल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारतात. ग्युलिया रे यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची आई या दुकानापासून जवळ राहते आणि हे दुकान आहे तिथं ती कधीही येऊ शकते. सध्याच्या काळात ती दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही, पण ती इथं सहज येऊ शकते. त्यामुळं तिला इथं आल्यावरदेखील बरं वाटतं.
  First published: