पॅलेस्टाईन, 20 जुलै : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या आजाराची लागण झालेल्या आपल्या नातेवाईकाला पाहण्यासाठी रुग्णालयातही जाता येत नाही. कोरोनाचा प्रसार होईल या भीतीने कोरोना वॉर्डमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटण्यास सक्त मनाई आहे. आतापर्यंत अनेकांना आपल्या नातेवाईकांचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे एका मुलाला आपल्या आईपासून दूर जाण्याची ही कहाणी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी तरळेल. पॅलेस्टाईनच्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान तिच्या मुलाला रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मुलगा दररोज रुग्णालयाची इमारत चढून आपल्या आजारी आईच्या खिडकीपाशी येऊन तिला न्याहाळत होता. हे वाचा- रस्त्यावर नाचत होते तिघे,पोलीस येताच दोघे पळाले अन् तिसऱ्याला चोप VIDEO जोपर्यंत महिला जिवंत होती, तोपर्यंत तो दररोज खिडकीपाशी येऊन आईला पाहत होता. त्याचा एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. स्थानिक न्यूज वेबसाईट अलनासनुसार बेइट आवा शहरातील पॅलेस्टिनी युवक जिहाद अल-सुवाती याने हेब्रोन रुग्णालयाच्या आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला शेवटचं पाहिलं. पॅलेस्टाईनमध्ये 73 वर्षीय महिला रश्मी सुवित्ती याचं गुरुवारी निधन झालं. त्यांचा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीवर चढून आईला न्याहाळत होता. कोणीतरी त्याचा हा फोटो क्लिक केला. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.