Home /News /videsh /

Russia-Ukraine War: रशियन सैनिकांकडून युक्रेनी तरुणींवर रेप करुन हत्या? खासदाराने शेअर केले भयंकर फोटो

Russia-Ukraine War: रशियन सैनिकांकडून युक्रेनी तरुणींवर रेप करुन हत्या? खासदाराने शेअर केले भयंकर फोटो

रशियाचे सैनिक युक्रेनच्या नागरिकांवर केवळ हल्ले करत नाहीयेत, तर तिथल्या अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचारही (Russian Soldiers Rape And Kill) करत असल्याचा दावा युक्रेनच्या महिला खासदाराने केला आहे.

नवी दिल्ली, 5 एप्रिल : गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असलेलं रशिया-युक्रेनमधलं युद्ध (Russia Ukraine War) अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. युक्रेनमधल्या कोसळलेल्या इमारतींचे, रशियाच्या रणगाड्यांचे असे विविध फोटो इंटरनेटवर पोस्ट होत आहेत. यामुळे युद्धाची दाहकता सर्वांनाच दिसून येत आहे. मात्र युक्रेनमध्ये अशा काही संतापजनक गोष्टीही होत आहेत, ज्या आत्ता जगासमोर येऊ लागल्या आहेत. रशियाचे सैनिक युक्रेनच्या नागरिकांवर केवळ हल्ले करत नाहीयेत, तर तिथल्या अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचारही (Russian Soldiers Rape And Kill) करत असल्याचा दावा युक्रेनच्या महिला खासदाराने केला आहे. लहान मुलींवर अमानुष अत्याचार लेसिया वासिलेंक (Lesia Vasylenko) नावाच्या या खासदाराने आपल्या ट्विटर हँडलवरून (Lesia Vasylenko Tweets) हा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. रशियाच्या सैनिकांनी दहा वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार (Russian Soldiers Raped 10 Year Old) करून, तिच्या शरीरावर चटके देऊन स्वस्तिक चिन्ह (Women With Swastika Shaped burns) काढलं असल्याचा आरोप लेसिया यांनी केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी 'स्टॉप जिनोसाइड' (#StopGenocide) आणि 'स्टॉप पुतीन नाऊ' (#StopPutinNow) असे हॅशटॅग्ज वापरले आहेत. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचा - Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध कसे संपेल? कोणाला घ्यावी लागेल माघार? या आहेत मुख्य शक्यता

युक्रेनी नागरिकांची सुरू आहे कत्तल युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैनिक युक्रेनमधल्या नागरिकांची अमानुषपणे हत्या (Russian Soldiers Killing Civilians) करत आहेत. राजधानी कीवजवळच्या शहरांमध्ये सुमारे 410 नागरिकांचे मृतदेह मिळाले होते, तर बूचा शहरात पत्रकारांना 21 मृतदेह सापडले होते. या सर्वांवर अगदी जवळून गोळ्या चालवल्या गेल्या होत्या, तर कित्येकांचे हात पाठीमागे बांधले होते. मोतिजिन शहराच्या मेयर, त्यांचे पती आणि त्यांच्या मुलाला बांधून, तसंच त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून गोळ्या मारण्यात आल्या होत्या. रशियाने ‘वॉर क्राइम’ केल्याचे पुरावे युरोपियन युनियनचे परराष्ट्र नीती प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या अत्याचाराला रशियन सैनिकच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 'युद्ध अपराध (Russian Soldiers War Crime) आणि इतर गंभीर अपराध करणाऱ्या सर्व सैनिकांना आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं जाईल,' असं बोरेल म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनीदेखील रशियाने वॉर क्राइम (War Crime) केल्याच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. रशियावर जगभरातून टीका युक्रेनी नागरिकांवर होत असलेले अत्याचार समोर आल्यानंतर रशियावर जगभरातून टीका होत आहे. पुन्हा एकदा काही पाश्चिमात्य देशांनी रशियावर कारवाईचं आवाहन केलं आहे. पोलंडचे पंतप्रधान माटुस्ज मोरवीकी यांनी रशियाला हुकुमशाही-फॅसिस्ट देश म्हटलं आहे. रशिया युक्रेनमध्ये करत असलेला नरसंहार पाहता हेच नाव त्यांच्यासाठी योग्य असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचा - Russia-Ukraine War: युक्रेनच्या किवमधलं भयानक वास्तव, रस्त्यावर बेवारस सापडले 410 मृतदेह

दरम्यान, अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी रशियावर अधिकाधिक निर्बंध लागू केले आहेत. रशियाचा हा चेहरा समोर आल्यानंतर आता रशियावरचे निर्बंध आणखी वाढवण्याचा विचार हे देश करत आहेत.
First published:

Tags: Crime, Rape, Russia, Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या