Home /News /videsh /

Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये एका रशियन महिला पत्रकाराचा मृत्यू

Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये एका रशियन महिला पत्रकाराचा मृत्यू

Russia-Ukraine War

Russia-Ukraine War

रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. रशिया युक्रेनवर करत असलेल्या हल्ल्यांनंतरची भीषण दृश्यं तर जगभर व्हायरल झाली आहेत. अशाच एका लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका रशियन पत्रकाराचा रशियाच्याच हल्ल्यात युक्रेनमध्ये मृत्यू (Russian Journalist Dead) झाला.

पुढे वाचा ...
    कीव, 24 मार्च: दोन देशांमधल्या युद्धाची किंमत निरपराध नागरिकांना चुकवावी लागते. परस्पर द्वेषांतून कितीतरी निष्पाप नागरिकांचे जीव जातात. (Innocent death in War) पण त्याचबरोबर काहीतरी चांगलं काम करु पाहणारेही यात बळी पडतात. रशिया-युक्रेनच्या युद्धाबाबतही (Russia- Ukraine War) हीच परिस्थिती आहे. जगभरात सगळीकडे या युद्धाची दृश्यं किंवा अनेकदा लाइव्ह रिपोर्टिंगही (Live Reporting) दाखवलं जात आहे. रशिया युक्रेनवर करत असलेल्या हल्ल्यांनंतरची भीषण दृश्यं तर जगभर व्हायरल झाली आहेत. अशाच एका लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका रशियन पत्रकाराचा रशियाच्याच हल्ल्यात युक्रेनमध्ये मृत्यू (Russian Journalist Dead) झाला. युक्रेनमधून 800 भारतीयांना परत आणणाऱ्या महिला वैमानिकाचा थरारक अनुभव! युक्रेनची राजधानी कीववर (Kyiv) बुधवारी रशियानं हल्ला केला. या हल्ल्यात 42 वर्षांची रशियन पत्रकार ओक्साना बॉलिना (Oxana Bolina) हिचा जीव गेला. राजधानी कीवमधील पोडॉल्स्की जिल्ह्यात रशियानं केलेल्या तुफान हल्ल्याच्या वेळेस रिपोर्टिंग करत असताना या पत्रकाराला जीव गमवावा लागला. हल्ला झाला तेव्हा ती कीवमध्ये झालेल्या भीषण नुकसानाचा व्हिडिओ शूट करत होती. बॉलिना ही एक उत्तम पत्रकार होती. रशियामध्ये भ्रष्टाचाराविरोधात ती सातत्याने रिपोर्टिंग करत होती. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिनानं इनसाइडरसाठी कीव आणि लिवमधून अनेक रिपोर्ट्स केले होते. बॉलिनाच्या मृत्युबद्दल इनसाइडरनं दु:ख व्यक्त केलं आहे. या हल्ल्यानंतरही युक्रेनमधील युद्धाचं कव्हरेज आपण सुरुच ठेवणार असल्याचं इनसाइडरनं म्हटलं आहे. बॉलिनाच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावरून तिला श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिनानं रशियाचेविरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनीच्या (Alexi Navalanie) अँटिकरप्शन ग्रुपसाठीही (भ्रष्टाचारविरोधी) काम केलं होतं. गेल्यावर्षीच या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर बॉलिनाला तिचा देश सोडणं भाग पडलं होतं. युक्रेनच्या संकटात अमेरिकेने म्यानमारच्या हिंसाचाराला नरसंहार का म्हटले?  बॉलिनाच्या मृत्युनंतर नवलनी यांच्या गटातील तिच्या सहकाऱ्यांनी आपण घाबरणार नसल्याचं सांगितलं आहे. बॉलिनाच्या मृत्युचा आपण बदला घेणार असल्याचं तिच्यासोबत काम करणाऱ्या व्लादिमीर मिलोव्हनं म्हटलं आहे. त्यानं याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘तिच्या मृत्युला जबाबदार असलेल्यांना मी कधीही माफ करणार करणार नाही. ते आता कोर्टातील खटला आणि निर्णयापासून वाचू शकत नाहीत.’ असं त्यानी ट्विटमध्ये म्हटलंय. तर हा हल्ला भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया नवलनीच्या टीममधील आणखी एक सहकारी हुसोव सोबोलनं दिली आहे. युक्रेनमधील हल्ल्यात एका स्फोटानंतर रिपोर्टिंग करत असताना रशियानं केलेल्या हल्ल्यात बॉलिनाचा मृत्यू झाल्याची पुष्टी युक्रेनियन जर्नलिस्ट युनियनचे प्रमुख सर्गेई टोमिलेंको यांनी केली आहे. युक्रेनवरील हल्ल्यात कितीतरी निरपराध नागरिकांचा जीव तर गेला आहेच पण आतापर्यंत पाच पत्रकारांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये अमेरिकेतील चित्रपट निर्माता आणि पत्रकार ब्रेंट रेनॉड, फ्रान्स-आयरिश कॅमेरामन पिअरे जकर्जवेस्की, युक्रेनमधील निर्माता ऑलेक्जेंड्रा कुवशिनोव्हा यांचा समावेश आहे. तर 1 मार्चला किवमधील टीव्ही टॉवरवर झालेल्या हल्ल्यात स्पॅनिश न्यूज एजन्सी EFE चे प्रतिनिधी आणि युक्रेनच्या टेलिव्हीजन चॅनेल LIVE चे कॅमेरा ऑपरेटर येवेनी सुकेन मारले गेले. बुधवारी झालेल्या हल्ल्यात बॉलिनासह तिथं असलेल्या अन्य एका युक्रेनी नागरिकाचाही जीव गेला, तर दोघेजण जखमी झाले.
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine

    पुढील बातम्या