Home /News /videsh /

कॅमेऱ्यासमोर उभं राहून महागड्या बॅगांचे तुकडे का करतायेत रशियन तरुणी? जाणून घ्या

कॅमेऱ्यासमोर उभं राहून महागड्या बॅगांचे तुकडे का करतायेत रशियन तरुणी? जाणून घ्या

Russian Girls cut up Chanel Handbags : रशियाच्या सुंदर, श्रीमंत आणि ग्लॅमरस मुलींनी यावेळी एक वेगळी मोहीम सुरू केली आहे. कॅमेऱ्यासमोर लाखो रुपयांच्या बॅगा (Chanel bags) फाडत आहेत. यावेळी त्यांनी एक संदेश जारी केला आहे.

    मॉस्को, 8 एप्रिल : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War Updates) दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक संघर्षच नव्हे, तर याचा जगातल्या विविध गोष्टींवर परिणाम होत आहे. रशियाच्या उत्पादनांवर (Russian Products Ban in Europian Countries) युरोपीय देशांकडून बंदी घातली जात आहे. तर रशियासुद्धा त्यांच्या या आर्थिक हल्ल्याला आपल्या पातळीवर प्रत्युत्तर देत आहे. यामध्ये रशियाचे नागरिकही सहभागी होत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक पटलावर मोठे परिणाम दिसून येत आहेत. अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांसह रशियन उत्पादनांवरही बंदी घातली आहे. त्यामध्ये इतर देशांनी रशियन व्होडकाबाबत घेतलेली भूमिका आपण जाणतोच. अमेरिकन फूड चेनमधील जगप्रसिद्ध कंपनी मॅकडोनॉल्ड (McDonald's) ने आपली रशियामधली आउटलेट्स बंद केली आहेत. नव्या प्रकरणात फ्रेंच लक्झरी कंपनी Chenel ने रशियन नागरिकांना आपली उत्पादनं न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात रशियातील श्रीमंत, ग्लॅमरस तरुणी मैदानात उतरल्या असून, त्या कॅमेऱ्यासमोर उभं राहून जुन्या फ्रेंच शनेल बॅगांचे, पर्सेसचे (Russian Cutting Chanel Bags) कात्रीने तुकडे तुकडे करत आहेत. हे व्हिडिओ त्या सोशल मीडियावर शेअरही करत आहेत. Russia-Ukraine War : 'इतके' दिवस चालू शकते रशिया-युक्रेन युद्ध; वाचा, अमेरिका काय म्हणाला? महागड्या बॅगांचे तुकडे शनेल ब्रँडने ‘रशियाफोबिक’ म्हणजे रशियाचा तिरस्कार करणारी मानसिकता तयार केल्याचं लक्षात आल्यानंतर रशियातील श्रीमंत तरुणींनी त्यांच्याकडे असलेल्या शनेलच्या ब्रँडेड बॅगांचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे. या बॅगांच्या किमती काही लाख रुपये आहेत. या तरुणी स्वतः कात्रीने शनेल बॅगचे तुकडे करून त्या नष्ट करताना दिसत आहेत. त्याचबरोबर हे करणं म्हणजे आपलं देशप्रेम व्यक्त करणं आहे असंही त्या व्हिडिओत म्हणत आहेत. त्यांचं रशियावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ती ही कृती करत आहेत. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे शनेल कंपनीने रशियामध्ये व्यापारावर बंदी घातली आहे. त्याविरोधात आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करत या तरुणी शनेल ब्रॅंडच्या बॅग स्वतः नष्ट करत आहेत. Daily Star च्या वृत्तानुसार, आपण कधीही शनेल ब्रँडच्या बॅग खरेदी करणार नाही. Chenel च्या बॅग खरेदी करणं देशाद्रोह केल्यासारखं आहे, असं 28 वर्षीय अभिनेत्री मरिना हिनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. Russophobia मुळे नुकसान अभिनेत्री मरिना हिच्याप्रमाणे रशियातील सर्व श्रीमंत मुली व्हिडिओच्या माध्यमातून आपलं देशप्रेम व्यक्त करत आहेत. युरोपियन ब्रँडच्या रशियाबद्दलच्या या द्वेषाला त्या रस्सोफोबिया Russophobia असं नाव देतात. हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असंही त्या म्हणतात. शनेल लग्झरी ब्रँडशिवाय McDonald's आणि Coca Cola सारख्या फूड अँड ब्रेव्हरेज कंपन्यांनीसुद्धा रशियामधील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या