कीव, 1 मे : रशिया-यूक्रेन युद्धाचा (russia ukraine war) आज 67वा दिवस आहे. रशियाने गेल्या २४ तासांत युक्रेनच्या लष्करी तळांवर पुन्हा मोठे हल्ले केले आहेत. (russia attack on ukrain) रशियन सैन्याने क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करून 17 युक्रेनियन लष्करी तळ नष्ट केले आहेत. याशिवाय, युक्रेनियन सैन्याचे कमांड पोस्ट आणि अन्न गोदामही हल्ल्यात नष्ट झाले. तसेच या हल्ल्यामध्ये युक्रेनचे 200 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर युक्रेनियन सैन्याची 23 चिलखती वाहने देखील नष्ट झाल्याची माहिती आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात एअरस्ट्रिप उद्ध्वस्त ओडेसाच्या गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने ओडेसा या किनारी शहराच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला करून हवाई पट्टीचेही मोठे नुकसान केले आहे. खार्किवमध्ये झालेल्या भीषण चकमकीत युक्रेनच्या लष्कराने रशियन सैन्याकडून चार तळ परत घेतल्याचा दावा केला आहे. युक्रेनियन सैन्याने दावा केला आहे की रशियन सैन्याने शनिवारी डॉनबास भागात मोठे हल्ले केले परंतु तीन भाग ताब्यात घेण्यात अयशस्वी झाले. रशियन सैन्य सध्या डोन्स्कमधील लायमन आणि स्व्हिरोडोन्स्क आणि लुहान्स्कमधील पोप्साना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. हेही वाचा - TIME नियकालिकाच्या मुखपृष्ठावर जेलेन्स्की यांचा फोटो, काय आहे युक्रेनी अध्यक्षांचा प्लॅन? शस्त्रास्त्रांचा पुरवठा युद्धविरामाची शक्यता कमी - पाश्चात्य देशांचे निर्बंध आणि युक्रेनियन सैन्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा कदाचित युद्धविराम कमकुवत करेल आणि युद्ध तीव्र करेल, असे रशियाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत, युक्रेनला $8 अब्ज पेक्षा जास्त किमतीची शस्त्रे पुरवली गेली आहेत. यापेक्षा कितीतरी पट अधिक शस्त्रे येत्या काळात सापडणार आहेत. रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनला अमेरिका, ब्रिटनसह जवळपास 40 देश शस्त्रपुरवठा करत आहेत.
रशियाने डॉल्फिन्सना दिलं खास प्रशिक्षण -
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (russia ukraine war ) युद्ध सुरू आहे. रशियाने (russia) युक्रेनवर नव्याने हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, काही उपग्रह छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यामध्ये रशियन नौदलाने आपल्या सुरक्षेसाठी समुद्रातल्या माशांचा वापर केला आहे. काही मासे काळ्या समुद्रात रशियन नौदल तळाचे रक्षण करत आहेत. रशियाने या माशांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे, जे त्यांना धोका वाटल्यास हल्ला करू शकतात. युक्रेन युद्धादरम्यान रशियाने काळ्या समुद्रातील आपल्या नौदल तळाच्या संरक्षणासाठी प्रशिक्षित डॉल्फिन तैनात केल्याचा दावा USNI न्यूज (United States Naval Institute) ने केला आहे. रशियन नौदलाने सेवास्तोपोल (Sevastopol) बंदराच्या प्रवेशद्वारावर दोन डॉल्फिन पेन ठेवल्या आहेत. या डॉल्फिनना समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेली कोणतीही वस्तू सापडेल अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे. तसेच ते गुप्तचर मोहिमा पार पाडू शकतात.