Home /News /videsh /

रशियन सैनिकांचा युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, 1000 हून अधिक नागरिकांना बंदी बनवलं

रशियन सैनिकांचा युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, 1000 हून अधिक नागरिकांना बंदी बनवलं

युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने शनिवारी सांगितलं की, गेल्या 24 तासांत रशियन सैन्याने पूर्वेकडील डोनेस्तक, लुहान्स्क आणि खार्किव, मध्य युक्रेनमधील निप्रॉपेट्रोव्स्क, पोल्टावा आणि किरोव्होहराड आणि दक्षिणेकडील मायकोलिव्ह आणि खेरसन या आठ क्षेत्रांमध्ये गोळीबार केला.

पुढे वाचा ...
    कीव, 17 एप्रिल : रशियन सैन्याने युक्रेनच्या लिसिचान्स्क शहरातील तेल शुद्धीकरण कारखान्यावर बॉम्बफेक केली आणि तेथे मोठी आग लागली. तेथील राज्यपालांनी ही माहिती दिली. लुहान्स्कचे प्रादेशिक गव्हर्नर सेरीही म्हणाले की, तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रशियन सैन्याने स्थानिक आपत्कालीन सेवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी रिफायनरीमध्ये कोणतंही इंधन नव्हतंय 'तेल सामग्रीच्या अवशेषां'ना आग लागली. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने शनिवारी सांगितलं की, गेल्या 24 तासांत रशियन सैन्याने पूर्वेकडील डोनेस्तक, लुहान्स्क आणि खार्किव, मध्य युक्रेनमधील निप्रॉपेट्रोव्स्क, पोल्टावा आणि किरोव्होहराड आणि दक्षिणेकडील मायकोलिव्ह आणि खेरसन या आठ क्षेत्रांमध्ये गोळीबार केला. अहवालानुसार, खार्किवमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक लोक जखमी झाले. तर, लगतच्या इतर भागात दोघांचा मृत्यू झाला. मायकोलिव्हवर रशियाचा भीषण हल्ला सुरूच आहे दक्षिणेत, मायकोलिव्हवर शुक्रवार आणि शनिवारी भयानक हल्ले झाले. राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात पाच जण ठार तर 15 जण जखमी झाले. प्रादेशिक विधिमंडळाच्या प्रमुख हन्ना जमाजीवा यांनी शनिवारी सांगितलं की, गेल्या 24 तासांत झालेल्या हल्ल्यांमध्ये 39 जण जखमी झाले आहेत. जमझीवा म्हणाले की, रशियन सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य केलं.

    युक्रेनच्या उप पंतप्रधान इरिना वेरेशचुक यांनी शनिवारी टेलिव्हिजनवर सांगितले की, 700 युक्रेनियन सैनिक आणि 1,000 हून अधिक नागरिकांना सध्या रशियन सैन्याने बंदी बनवलं आहे. निम्म्याहून अधिक नागरिक महिला आहेत. वेरेशचुक म्हणाले की, रशिया कीवमधील बंदिवान सैनिकांची देवाणघेवाण करू इच्छित आहे. कारण, युक्रेनकडे तितकंच रशियन सैन्य बंदी बनवलेलं आहे. ते म्हणाले की, 'कोणत्याही अटींशिवाय' नागरिकांना सोडण्याची त्यांची मागणी आहे.

    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

    पुढील बातम्या