मराठी बातम्या /बातम्या /विदेश /रशिया-युक्रेन युद्धात फसली पुतिन यांची 'Secret Girlfriend', आता होतेय 'ही' मागणी

रशिया-युक्रेन युद्धात फसली पुतिन यांची 'Secret Girlfriend', आता होतेय 'ही' मागणी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War)  'फसली' आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) 'फसली' आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) 'फसली' आहे.

मॉस्को,19 मार्च: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) 'फसली' आहे. अलिना स्वित्झर्लंडमध्ये लपून बसली असल्याचं बोललं जात आहेत. पुतीन यांची गर्लफ्रेंड स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित ठिकाणी असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.

दरम्यान, अलीनाला देशातून हाकलून देण्याची मागणी होत आहे. स्वित्झर्लंडमधील काही कार्यकर्त्यांनी एक याचिका दाखल केल्याचं वृत्त आहे, ज्यामध्ये पुतीन यांच्या गर्लफ्रेंडला देशातून हाकलून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पूर्णपणे बदलले आयुष्य

अलिना पुतिन यांच्या तीन मुलांची आई असल्याचं म्हटलं जातं. एक खेळाडू म्हणून अलिनाच्या नावावर अनेक पदके आणि रेकॉर्ड आहेत. मात्र पुतिन यांच्यासोबत नाव जोडल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. आता ती रशिया-युक्रेन युद्धात वाईटरित्या 'फसली' आहे. स्वित्झर्लंडच्या लोकांना आश्रय नको आहे कारण तिचे युक्रेनला युद्धात ढकलणाऱ्या पुतिन यांच्याशी संबंध आहेत.

2018 ला दिसली होती शेवटची

अलीना शेवटची 2018 मध्ये दिसली होती जेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर होती. व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे अलिनाबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र रशियावर चौफेर निर्बंध लादल्यामुळे पुतिन यांनी आपल्या कुटुंबाला स्वित्झर्लंडला पाठवल्याचे मानले जात आहे.

भारतात कधी येऊ शकते Corona ची चौथी लाट?, तज्ज्ञांनी सांगितलं...

अलिना एक यशस्वी जिम्नॅस्ट आहे. तिनं ऑलिम्पिकमध्ये दोन गोल्ड मेडल, 14 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 25 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहेत. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला आणि पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाच्या खासदार बनली.

2008 मध्ये पहिल्यांदा जोडलं गेलं नाव

अलिना आणि पुतिन यांची नावे 2008 मध्ये पहिल्यांदा एकमेकांशी जोडली गेली होती. पुतिनच्या आधी 2004 मध्ये डेव्हिड मुसेलियानीसोबत अलिनाचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियन वृत्तपत्र मॉस्कोव्स्की कॉरस्पॉन्डंटने प्रथम पुतिन आणि अलिना यांचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. मात्र काही काळानंतर ही बातमी नाकारण्यात आली आणि रशियन वृत्तपत्र बंद करण्यात आलं. 2019 मध्ये मॉस्कोमधील रुग्णालयात अलिनाने दोन मुलांना जन्म दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावेळी रुग्णालयाचा व्हीआयपी मजला रिकामा करण्यात आला. मात्र नंतर या वृत्ताचंही खंडन करण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Russia's Putin