कीव, 15 एप्रिल: रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या 50 दिवसांपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत, मात्र अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. (Russia-Ukraine War News) दरम्यान अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने रशियाकडून आण्विक हल्ल्याची (Nuclear Weapon)भीती व्यक्त केली आहे.
या युद्धात रशियाला अनेक धक्के
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे युक्रेनविरुद्ध हलक्या अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, अशी भीती सीआयएचे संचालक विलियम बर्न्स(CIA Director William J. Burns) यांनी व्यक्त केली आहे.
बर्न्स म्हणाले, रशियन सैन्याला युक्रेनमध्ये विविध प्रकारचे धक्के बसले आहेत. यामुळे पुतिन आणि रशियन नेतृत्वाची घोर निराशा झाली आहे. या स्थितीत रशिया युक्रेनवर टॅक्टिकल किंवा हलकी न्यूक्लियर वेपन्स वापरू शकतो आणि ते चांगले लक्षण नाही.
टॅक्टिकल वेपन्स काय आहेत?
टॅक्टिकल वेपन्स 'बॅटलफिल्ड न्यूक्स' म्हणूनही ओळखली जातात. हे तुलनेने लहान आहेत, जे मोर्टारमधून लॉन्च केले जाऊ शकतात किंवा माइन स्फोट म्हणून वापरले जाऊ शकतात. दुसरीकडे, कमी-उत्पन्न किंवा हलकी अण्वस्त्रे एक लहान विस्फोट तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, जी कधीकधी पारंपारिक आणि आण्विक शस्त्रांमधील फरक अस्पष्ट करते.
कमकुवत होतंय रशियन सैन्य
बर्न्स पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण सर्वच चिंतेत आहोत. रशियन सैन्य युद्धात कमकुवत होत असल्याने अण्वस्त्रांचा धोकाही वाढत आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांमुळे रशियाला युक्रेनमधील अत्याचार लपवणे कठीण झालं आहे. त्याचा क्रूर चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे. व्लादिमीर पुतिन हे प्रदीर्घ युद्धामुळे त्रस्त झाले आहेत आणि या संकटात ते कोणतंही मोठं पाऊल उचलू शकतात.
बर्न्स यांनी रशियामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले
सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी रशियामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणूनही काम केलं आहे आणि ते व्लादिमीर पुतिन यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. याआधीही पुतिन युद्ध लांबवण्याच्या रागात परमाणु हल्ला करू शकतात, अशा गोष्टी समोर आल्या आहेत. हे अहवाल खरे ठरले तर जगाला आणखी एका महायुद्धाला सामोरे जावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine, Russia's Putin