मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पुतिननी साऱ्या जगाला दाखवला आपला 'सैतान', अमेरिकेने दिली अशी प्रतिक्रिया

पुतिननी साऱ्या जगाला दाखवला आपला 'सैतान', अमेरिकेने दिली अशी प्रतिक्रिया

Russia Satan-2 Missile: ब्रिटनचे संरक्षण तज्ज्ञ डॉ. पॉल क्रेग रॉबर्ट यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रशियाची 5 किंवा 6 सरमत क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीला राखेचा ढिगारा बनवू शकतात.

Russia Satan-2 Missile: ब्रिटनचे संरक्षण तज्ज्ञ डॉ. पॉल क्रेग रॉबर्ट यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रशियाची 5 किंवा 6 सरमत क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीला राखेचा ढिगारा बनवू शकतात.

Russia Satan-2 Missile: ब्रिटनचे संरक्षण तज्ज्ञ डॉ. पॉल क्रेग रॉबर्ट यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रशियाची 5 किंवा 6 सरमत क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीला राखेचा ढिगारा बनवू शकतात.

वॉशिंग्टन/मॉस्को, 22 एप्रिल : युक्रेनच्या भीषण युद्धाच्या (Ukraine War) वेळी रशियानं आपलं अति-विध्वंसक आंतरखंडीय क्षेपणास्त्र 'सैतान-2' (Satan-2) लॉन्च करून जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 15 वारहेड वाहून नेणाऱ्या सरमत क्षेपणास्त्राच्या चाचणीची (Russia missile launch) घोषणा केली. सरमतला 'सैतान क्षेपणास्त्र' असंही संबोधलं जात आहे. या क्षेपणास्त्रात ब्रिटन, फ्रान्स किंवा अमेरिकेच्या टेक्सास प्रांताला केवळ एकाच तडाख्यात उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणानंतर अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने (Pentagon) प्रतिक्रिया दिली आहे.

पेंटागॉनने पुतीन यांच्या नव्या क्षेपणास्त्राचा फारसा धोका नसल्याचं म्हटलं आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ही एक नियमित चाचणी होती. यात काही विशेष नव्हते. आम्ही ही चाचणी अमेरिका किंवा त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी धोका असल्याचं मानलेलं नाही.

अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी सांगितलं की, रशियाने या प्रक्षेपणाची माहिती आधीच अमेरिकेला दिली होती. मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात नव्याने आणलेल्या अण्वस्त्र नियंत्रण करारामुळे (Start Nuclear Arms Control Treaty) हे घडले.

हे क्षेपणास्त्र रशियाने आपल्या वायव्य भागातून डागलं होतं. संपूर्ण रशियाएवढं अंतर गेल्यानंतर हे क्षेपणास्त्र अवघ्या 15 मिनिटांत जपानजवळील कामचाटका द्वीपकल्पाच्या जवळ जाऊन पडलं. रशियाचे हे क्षेपणास्त्र कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेनं रोखलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच ते अपराजेय आहे.

रशियाचे नेक्स्ट जनरेशनचं क्षेपणास्त्र आहे सरमत

सरमत हे रशियाच्या नेक्स्ट जनरेशनमधील क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. या क्षेपणास्त्रांमध्ये किंजल आणि एवानगार्ड या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरमत इतर शस्त्रास्त्रांसह हायपरसॉनिक ग्लाइड वाहनालाही वाहून नेण्यास सक्षम आहे.

रशियन लष्कराच्या म्हणण्यानुसार, एवानगार्ड हायपरसॉनिक वाहन क्षेपणास्त्रात बसवता येऊ शकतं. एवानगार्ड ध्वनीच्या वेगापेक्षा 27 पट अधिक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असल्याचं लष्करानं म्हटलं आहे.

हे वाचा - रशिया युक्रेन युद्धात जर्मनीचा बळीचा बकरा बनत आहे का? वाचा पडद्यामागच्या गोष्टी

सरमत क्षेपणास्त्र किती शक्तिशाली आहे?

रशियाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हे 115 फूट लांब क्षेपणास्त्र भूमिगत सायलो मधून डागल्याचे दिसत आहे. यादरम्यान आगीच्या जोरदार ज्वाळा दिसत होत्या. सरमत किलर क्षेपणास्त्रामध्ये एक रॉकेट आहे, जे क्षेपणास्त्राला 16 हजार मैल प्रति तास वेगाने घेऊन जाते. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 10 ते 15 वॉरहेड्स वाहून नेऊ शकतं. यासह हे क्षेपणास्त्र एकाच उड्डाणादरम्यान 15 अणुबॉम्ब टाकू शकते. रशियाचा हा अणुबॉम्ब जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरात टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा 1000 पट अधिक शक्तिशाली आहे.

हे वाचा - हिना रब्बानी आणि बिलावल भुट्टोमध्ये होते अनैतिक संबंध! राष्ट्रपतीभवनात सापडले..

ब्रिटनचे संरक्षण तज्ज्ञ डॉ. पॉल क्रेग रॉबर्ट यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रशियाची 5 किंवा 6 सरमत क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीला राखेचा ढिगारा बनवू शकतात. रशियाने या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ऑक्टोबर 2017 मध्ये केली होती. त्यावेळी हे पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आण्विक क्षेपणास्त्र होते.

सरमत क्षेपणास्त्राचं वजन 208 टन असून ते सुमारे 18 हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. या क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे संचालक दिमित्री रोगोझिन म्हणाले की, हे शस्त्र नाटो आणि युक्रेनच्या समर्थकांना दिलेली 'भेट' आहे.

First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news