किव, 25 फेब्रुवारी: गुरुवारी सुरू झालेल्या युक्रेनवर (Ukraine) रशियन हल्ल्यानंतर (Russian attack) देश उद्ध्वस्त झाला आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीवला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ मेसेज समोर आला आहे. ज्यामध्ये ते पत्नी आणि मुलांबद्दल बोलताना असहाय्य आणि भावनिक दिसत आहेत. झेलेन्स्की व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की, मी रशियाचा पहिलं लक्ष्य आहे आणि माझं कुटुंब दुसरं आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या अधिकार्यांना इशाराही दिला की, रशियानं राजधानी कीवमध्ये घुसखोरी केली आहे. झेलेन्स्की म्हणतात की, ते आणि त्याचे कुटुंब देशद्रोही नाहीत आणि युक्रेनमधून पळून जाणार नाहीत. Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनवर हल्ला, भारत तुमच्या पाठीशी उभा आहे का? जो बायडेन यांनी दिलं हे उत्तर एका भावनिक व्हिडिओ मेसेजमध्ये झेलेन्स्की म्हणतात की, ‘मी युक्रेनमध्ये आहे. माझे कुटुंब युक्रेनमध्ये आहे. माझी मुलं युक्रेनमध्ये आहेत. ते देशद्रोही नाहीत… ते युक्रेनचे नागरिक आहेत. शत्रूनं मला पहिलं टार्गेट केलं असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. माझे कुटुंब हे त्यांचे दुसरे लक्ष्य आहे. ‘‘रशियाला मला मारायचं आहे’’ झेलेन्स्की पुढे आपल्या भावनिक मेसेजमध्ये म्हणतात की, रशियन सरकार त्याला संपवू इच्छित आहे. त्यांना (रशिया) देशाच्या प्रमुखाला संपवून युक्रेनचे राजकीय नुकसान करायचं आहे," असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. युक्रेन नाटोमध्ये सामील होईल की नाही हे त्यांनी थेट नाटोच्या 27 युरोपियन नेत्यांना प्रश्न विचारल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं. कोणीही उत्तर दिलं नाही, प्रत्येकजण घाबरला आहे. , पण आम्ही घाबरत नाही, आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. ते पुढे म्हणाले, आम्ही आमचा देश वाचवायला घाबरत नाही. आम्ही रशियाला घाबरत नाही. आम्ही रशियाशी चर्चेलाही घाबरत नाही. युक्रेनमध्ये सायकलस्वारावर तोफगोळा पडतानाचा थेट Live Video युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं आहे पण रशियाचा त्याला विरोध आहे. 2014 मध्ये युक्रेनमधील रशियन-समर्थित सरकार पडल्यानंतर, युक्रेनच्या सरकारांनी नाटोमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण रशिया नाटोला रशियाच्या सुरक्षेसाठी धोका मानतो, त्यामुळे कोणत्याही किंमतीत युक्रेनला नाटोचा सदस्य बनवायचा नाही. युक्रेनमध्ये एका दिवसात 137 लोकांचा मृत्यू झाला झेलेस्की यांनी आपल्या व्हिडिओ मेसेजमध्ये दावा केला आहे की, रशियन हल्ल्याच्या पहिल्या दिवशी युक्रेनमधील 137 लोक मारले गेले आणि 316 जखमी झाले. ते म्हणाले, मला दुःखाने सांगावं लागत आहे की, आज (गुरुवारी) आम्ही आमचे 137 वीर गमावले, त्यापैकी 10 अधिकारी होते. तर 316 जण जखमी झाले आहेत. आमच्या सैनिकांनी शरणागती पत्करली नाही. मरण पावलेल्या सर्व सैनिकांना युक्रेनचा हिरो ही पदवी दिली जाईल. या युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना आम्ही आमच्या आठवणीत ठेवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.